४९ धावांवर खेळणाऱ्या विराटला अर्धशतकासाठी कार्तिकने स्ट्राइक देऊ केला पण...; विराटच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक, पाहा Video | Ind vs SA Video Virat Kohli wins hearts tells Dinesh Karthik to continue hitting despite being one run short of 50 scsg 91 | Loksatta

४९ धावांवर खेळणाऱ्या विराटला अर्धशतकासाठी कार्तिकने स्ट्राइक देऊ केला पण…; विराटच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक, पाहा Video

विराटने काल अर्धशतक साजरं केलं असतं तर ते विक्रमी अर्धशतक ठरलं असतं.

४९ धावांवर खेळणाऱ्या विराटला अर्धशतकासाठी कार्तिकने स्ट्राइक देऊ केला पण…; विराटच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक, पाहा Video
हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

विराट कोहली हा त्याच्या क्रिकेटमधील विक्रमांसाठी ओळखला जातो. मात्र स्वत:साठी खेळण्यापेक्षा संघासाठी खेळण्यास महत्त्व देणाऱ्या विराटने अनेकदा आपल्या कृतीमधून संघ हा वैयक्तिक कामगिरीपेक्षा अधिक मोठा असल्याचं दाखवून दिलं आहे. असेच एक उदाहरण रविवारी गुवहाटीमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पाहायला मिळालं.

झालं असं की भारतीय संघ सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये विराट आणि दिनेश कार्तिक मैदानावर होते. विराट त्याच्या अर्धशतकापासून केवळ एक धाव दूर होता. मैदानात जमलेले चाहतेही विराटच्या अर्धशतकाची वाट पाहत होता. मात्र विराटने संघाला पहिलं प्राधान्य दिलं. शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करत असलेला दिनेश कार्तिक तुफान फटकेबाजी करत होता. एक सुंदर फटका लगावल्यानंतर कार्तिक क्रिजच्या मध्यभागी येऊन विराटला भेटला. दोघांनी एकमेकांना थम्बअप करत प्रोत्साहन दिलं.

कार्तिक काहीतरी विचारत असताना विराटने त्याला हातानेच नको नको म्हणत तू कर फलंदाजी असा इशारा केला. दिनेश कार्तिक विराटला एक धाव कढून ५० धावा करण्यासाठी स्ट्राइक देण्यासंदर्भात विचारपूस करत होता. मात्र विराटने कार्तिकची ही ऑफर नाकारली असं या व्हिडीओवरुन दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. विराटने काल अर्धशतक साजरं केलं असतं तर त्याचा विक्रम झाला असता. मात्र वैयक्तिक विक्रमांऐवजी संघाला प्राधान्य देत विराटने संघाच्या २०० हून अधिक धावा झाल्यानंतरही सांघिक धावसंख्या वाढवण्यास प्राधान्य दिलं. बीसीसीआयनेही हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

विराटच्या या कृतीचं सोशल मीडियावर फार कौतुक होताना दिसत आहे. पाहा काही व्हायरल ट्वीट्स…

१)

२)

३)

४)

५)

विराटने २८ चेंडूंमध्ये नाबाद ४९ धावा केल्या. यामध्ये सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद २३७  धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव २० षटकांत ३ बाद २२१ धावांवर आटोपला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० मालिका : भारताला विजयी आघाडी ; दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेवर १६ धावांची मात; सूर्यकुमार, राहुलची अर्धशतके

संबंधित बातम्या

जेलमधल्या सहा महिन्यांच्या मुक्कामात नवज्योत सिंह सिद्धूचं वजन ३४ किलोंनी घटलं; कशामुळे ते वाचा…
६,६,६,६,६,६,६ … एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारत ऋतुराज गायकवाडने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडीओ
Video: हार्दिक पांड्याच्या पार्टीत धोनीचा जलवा; डान्स पाहून पांड्याच्या बायकोची ‘ती’ कमेंट चर्चेत
Fifa World Cup 2022: मेस्सी-रोनाल्डोचे संघ होणार बाहेर? विश्वचषकाचे फसले गणित, जाणून घ्या समीकरण
आशिष नेहराची मोठी भविष्यवाणी; ‘हा’ युवा फलंदाज भारतीय संघाचा कायमस्वरूपी सलामीवीर होऊ शकतो

व्हिडिओ

ताज्या बातम्या
जिल्हांतर्गत शिक्षक बदलीचे आता तिसरे वेळापत्रक; बदली प्रक्रिया मेमध्ये पूर्ण करण्याची शिक्षकांची मागणी
आफताबवर तलवारीने हल्ला का केला? हिंदू सेनेचा कार्यकर्ता म्हणाला, “आम्ही त्याला फाडून…”
भारतातील प्रसिद्ध रुग्णालय AIIMSचा सर्व्हर हॅक; हॅकर्सनी मागितली २०० कोटींची खंडणी
करण जोहरच्या आगामी चित्रपटात झळकणार काजोल? ‘या’ स्टारकीडच्या आईची भूमिका साकारणार
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’