India Australia Twenty20 Series India Targets Series Win third match Australia today ysh 95 | Loksatta

भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका :  मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य!; आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात हर्षल, चहलवर नजर

गेल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधल्यानंतर भारतीय संघाचे रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय नोंदवत मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका :  मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य!; आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात हर्षल, चहलवर नजर
हर्षल पटेल

पीटीआय, हैदराबाद : गेल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधल्यानंतर भारतीय संघाचे रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय नोंदवत मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे. या सामन्यात हर्षल पटेल आणि यजुर्वेद्र चहल या भारताच्या दोन प्रमुख गोलंदाजांच्या कामगिरीवरही सर्वाची नजर असेल.

भारताने नागपूर येथे झालेला दुसरा ट्वेन्टी-२० सामना सहा गडी राखून जिंकला असला तरी आठ-आठ षटकांच्या झालेल्या या सामन्यात हर्षल आणि चहल यांनी निराशा केली. ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी या दोन्ही गोलंदाजांना लय सापडणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. यासह अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही सूर गवसलेला नाही. हर्षलमध्ये दुखापतीतून पुनरागमन करताना आत्मविश्वासाची कमतरता जाणवली. हर्षलला या मालिकेत एकही बळी मिळवता आलेला नाही.  दुसरीकडे,  गोलंदाजांची कामगिरी ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पहिल्या सामन्यात फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय नोंदवला, तर दुसऱ्या सामन्यात  गोलंदाजांना धावांचा बचाव करता आला नाही. 

  • वेळ : सायं.७ वा.  ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
IND vs AUS Highlight: आधी पार गळा धरला आणि आता.. रोहित शर्माला पाहून नेटकरी म्हणतात “हा कर्णधार…

संबंधित बातम्या

Fifa World Cup 2022 : जपानचा स्पेनवर विजय, जर्मनी थेट स्पर्धेबाहेर
FIFA WC 2022: मोरोक्कोच्या जादुई दोन गोलमुळे कॅनडा आणि बेल्जियम विश्वचषकातून बाहेर, क्रोएशिया बाद फेरीत दाखल
Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम
Video: आई बाबा नव्हे मनात फक्त ‘ती’ व्यक्ती…ऋतुराज गायकवाडने सांगितलं ६ बॉलमध्ये ७ षटकार मारण्याचं गुपित

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण: ‘Gaslighting’ ठरला World Of The Year! अर्थ वाचून नक्कीच श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण येईल
Fifa World Cup 2022 : जपानचा स्पेनवर विजय, जर्मनी थेट स्पर्धेबाहेर
विवाह समुपदेशन: भांडणांत मुलांची मधस्थी नकोच नातेसंबंध,
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा