India Tour Of Australia Update IND vs AUS: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या दौऱ्यासाठी रवाना होईल. ही मालिका २२ नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. यादरम्यान भारतीय संघाने एक सामना रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर, भारतीय संघाला पर्थमधील WACA मैदानावर १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान इंट्रा स्क्वॉड सामना खेळायचा होता, ज्यामध्ये त्यांचा सामना ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला पोहोचलेल्या भारत अ संघाशी होणार होता. मात्र, आता यात बदल करण्यात आला असून इंट्रा स्क्वॉड मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी टीम इंडिया पहिल्या कसोटी सामन्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित करेल.
भारतीय संघाने या दौऱ्यासाठी पहिल्या सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कोणताही घरचा संघ निवडला नाही, उलट संघांतर्गत सामना खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता तेही रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी, भारतीय संघ WACA मैदानावर सराव करेल जेणेकरुन ते कसोटी मालिकेपूर्वी स्वत:ची चांगली तयारी करू शकतील. या सरावात टीम इंडिया मॅच सिम्युलेशनचे प्रशिक्षण घेईल. यापूर्वी, भारतीय अधिकाऱ्यांची विनंती लक्षात घेऊन हे इंट्रा-स्क्वॉड सामने बंद सराव म्हणून त्यांचे प्रक्षेपण न होता खेळवले जाणार होते. पण आता ईएसपीएन क्रिकइन्फोच्या बातमीनुसार, हे देखील रद्द करण्यात आले आहे.
IND vs AUS: भारताने बॉर्डर गावसकर ट्रॉफीपूर्वी इंट्रा स्क्वॉड सामना का केला रद्द?
मिळालेल्या माहितीनुसार, WACA ची खेळपट्टीची उसळी पर्थ स्टेडियमच्या खेळपट्टीसारखी असल्याने सर्वच आघाडीच्या फलंदाजांना तिथे जास्त वेळ सराव करायचा आहे. इंट्रा स्क्वॉड सामन्यात जर एखादा फलंदाज स्वस्तात बाद झाला तर, या खेळपट्टीवर त्यांना जास्त वेळ सराव करण्याची संधी मिळणार नाही. भारतीय संघाने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मुख्य मालिकेपूर्वी सराव सामने खेळले होते. २०१८-१९ मालिकेपूर्वी,संघाने क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्ध चार दिवसीय सामना खेळला. २०२०-२१ दौऱ्यासाठी, त्यांनी ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या तीन दिवसीय सामना खेळत सराव केला होता.
ऑस्ट्रेलियाच्या मागील दोन दौऱ्यांमध्ये भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली, ज्यामध्ये कांगारू संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्यात त्यांना यश आले आहे. आता टीम इंडिया तिसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे आणि त्यात ते यशस्वी झाले तर नक्कीच नवा इतिहास लिहिला जाईल. मात्र, हे काम भारतीय संघासाठी इतके सोपे जाणार नाही.