रवींद्र जडेजाच्या (नाबाद ६६) फलंदाजीमुळे भारत-न्युझीलंडदरम्यान रंगलेली तिसरा एकदिवसीय सामना अनिर्णीत राहिला आहे. यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत न्युझीलंडने २-० अशी आघाडी घेतली असून, पुढचे दोन सामने जिंकून भारत ही मालिकाही अनिर्णीत राखू शकतो.
न्युझीलंडच्या ३१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे फलंदाज पटापट बाद झाल्याने हाही सामना भारत गमावणार अशी स्थिती होती. मात्र रवींद्र जडेजाने अवघ्या ४५ चेंडूत ६६ धावांची तूफान खेळी करत सामना खेचून आणला. अखेरच्या चेंडूवर भारताल जिंकण्यासाठी दोन धावांची गरज होती. जडेडाने चेंडू सीमापार करण्याचा प्रयत्न केला, मात्र क्षेत्ररक्षकाने तो चेंडू मध्येच आवडल्याने जडेजाला केवळ एकच धाव मिळाली आणि सामना अनिर्णित राहिला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2014 रोजी प्रकाशित
भारत-न्यूझीलंड तिसरा सामना अनिर्णीत
रवींद्र जडेजाच्या (नाबाद ६६) फलंदाजीमुळे भारत-न्युझीलंडदरम्यान रंगलेली तिसरा एकदिवसीय सामना अनिर्णीत राहिला आहे.
First published on: 25-01-2014 at 11:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India to chase 315 in third odi against new zealand