१९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अवघ्या चेंडूत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना जपानचा संघ अवघ्या ४१ धावांत गारद झाला होता. त्यानंतर ४२ धावांचे अतिशय सोपे आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार केले. जपानच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांनी अक्षरश: धुव्वा उडवला. पण महत्त्वाचे म्हणजे या पराभवनंतर भारतीय संघाला विजयी फोटो काढायला पोझ करायची होती. सहसा विजयी संघ या विजयी फोटोमध्ये असतो. पण भारताचा कर्णधार प्रियम गर्ग याने या फोटोमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या जपानच्या संघालाही बोलावले आणि त्यांच्यासोबत फोटो काढला. त्याच्या या खिलाडूवृत्ती आणि खेळभावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धवनला ‘गब्बर’ धक्का, IPL 2020 मध्ये खेळण्याबाबत साशंकता
जपानचा ४१ धावांत धुव्वा
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय अगदी सार्थ ठरवला. भारताच्या रवि बिश्नोई, कार्तिक त्यागी, आकाश सिंग आणि विद्याधर पाटील या चौघांच्या तोफखान्यापुढे जपानचा डाव ४१ धावांत आटोपला. जपानच्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जपानचे बाद झालेले फलंदाज १,७,०,०,०,०,०,७,५,१ अशा धावसंख्येवर बाद झाले. नील दाते, देबाशिष साहू, काझुमासा ताकाहासी, इशान फर्ट्याल आणि अश्ले थर्गेट या पाच फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. निम्मा संघ शून्यावर बाद झाला. केवळ शू नोगुची आणि केन्तु डोबेल या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी ७ धावा केल्या. तर नाबाद राहिलेल्या सोरा इचिकीलाही १ धावा करता आली.
1700 000 751… हा मोबाईल नंबर नाही; ‘हे’ आहे भारताविरूद्ध जपानचं स्कोअरकार्ड
भारताकडून रवि बिश्नोईने सर्वाधिक ४ बळी टिपले. त्याने ८ षटकांपैकी ३ षटके निर्धाव टाकली आणि केवळ ५ धावा दिल्या. कार्तिक त्यागीने ६ षटकात १० धावा देऊन ३ बळी घेतले. आकाश सिंगला ४.५ षटकात ११ धावा पडल्या पण त्याने २ गडी बाद केले. तर विद्याधर पाटीलनेदेखील ४ षटकात ८ धावांत १ बळी टिपला.
अवघ्या २९ चेंडूत भारताने जिंकला सामना
४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने धमाकेदार खेळी केली. त्याने १८ चेंडूत नाबाद २९ धावा कुटल्या. त्या खेळीत यशस्वीने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याला कुमार कुशाग्र याने चांगली साथ दिली. कुमारने ११ चेंडूच नाबाद १३ धावा केल्या. त्यात २ चौकार होते. जपानविरूद्धच्या सामन्यातील विजयामुळे भारताने या विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.