भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज शिखर धवन हा दुखापतीमुळे आगामी न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर झाला. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला टी २०, एकदिवसीय आणि कसोटी अशा तीनही मालिकांतून माघार घ्यावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो त्या सामन्यात फलंदाजी करू शकला नव्हता. आता शिखर धवन याची दुखापत गंभीर असल्याने तो IPL मधील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

IND vs NZ : धवनच्या जागी मुंबईकर खेळाडूला संधी; पाहा T20…

IPL मधील सुरूवातीच्या सामन्यांना मुकणार?

IPL 2020 चे अद्याप अधिकृत वेळापत्रक देण्यात आलेले नाही. पण २९ मार्च किंवा १ एप्रिल २०२० पासून IPL 2020 ही स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे. जर नियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धा सुरू झाली, तर शिखर धवनला या स्पर्धेच्या सुरूवातीच्या सामन्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत त्याला बदली खेळाडू देण्यात आले. पण ताज्या माहितीनुसार, शिखर धवन याची दुखापत गंभीर आहे. शिखर धवनला या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान १० आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. १० आठवड्यांचा कालावधी म्हणजेच सुमारे अडीच महिने (एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत) तो क्रिकेटपासून दूर राहू शकतो. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या दिल्लीच्या सामन्यांना त्याला मुकावे लागणार असल्याची शक्यता आहे.

IND vs NZ : संजू सॅमसनला अखेर संधी; BCCI कडून हिरवा कंदील

श्रीलंकेविरूद्धच्या टी २० मालिकेत एका सामन्यात संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती. त्या सामन्यात त्याने पहिला चेंडू षटकार लगावला तर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंड मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. त्या संघात संजू सॅमसनला संधी दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण त्याला संघातून वगळल्यामुळे नेटकऱ्यांनी BCCI वर टीकेची झोड उठवली होती. अखेर धवनच्या दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळाले आहे.

IND vs NZ : धवनच्या जागी संघात युवा मुंबईकर खेळाडू

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर ५ ते ११ फ्रेब्रुवारी दरम्यान ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आलेल्या संघात दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी युवा मुंबईकर पृथ्वी शॉ ला संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाने पहिल्याच सामन्यात शानदार विजेतेपद मिळवले होते. दुखापतीमधून सावरत संघात पुनरागमन केलेल्या पृथ्वी शॉने दमदार शतक ठोकले होते. पृथ्वीने १०० चेंडूत २२ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने पृथ्वी शॉने १५० धावा केल्या होत्या.