India vs Australia 3rd T20 Highlights , 28 November 2023 : ग्लेन मॅक्सवेलने गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात वादळी शतक (नाबाद १०४ धावा) झळकावले. त्याने अवघ्या ४८ चेंडूत ८ चौकार आणि ८ षटकार मारून ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. कांगारूंना विजयासाठी शेवटच्या दोन षटकात ४३ धावा करायच्या होत्या. यानंतर १९व्या षटकात २० धावा आल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या षटकात २१ धावा करायच्या होत्या आणि प्रसिध कृष्णाच्या हातात चेंडू होता. मात्र, मॅक्सवेलने अशक्य ते शक्य करून दाखवले. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर २२३ धावांचे लक्ष्य गाठले.
IND vs AUS 3rd T20 Highlights Today : गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मॅक्सवलेच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच गडी राखून पराभव केला.
Accuweather नुसार, २८ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीमध्ये दिवसा ढगाळ हवामान राहण्याची अपेक्षा आहे. आकाश ढगांनी झाकले जाण्याची शक्यता आहे. संध्याकाळी रिमझिम पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता खेळ सुरू होईल. त्यावेळी कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे आणि खेळ संपल्यानंतर भारतीय वेळेनुसार रात्री १०:३०च्या सुमारास तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना आणखी एक रोमांचक सामना पाहता येणार आहे.
✈️ Next stop ➡️ Guwahati ??#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/DdwbksHZlj
— BCCI (@BCCI) November 27, 2023