India vs Bangladesh Champions Trophy 2025 Live Telecast: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा मुकाबला बांगलादेशशी होत आहे. सलामीच्या लढतीत दमदार विजय मिळवत नेट रनरेटच्या चांगला ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. बांगलादेशसमोर मात्र बलाढ्य भारतीय संघाचं आव्हान असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत-पाकिस्तान संबंध दुरावलेले असल्यामुळे भारताने पाकिस्तानाच जायला नकार दिला. यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत होणार आहेत. उर्वरित सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत. स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत न्यूझीलंडने यजमान पाकिस्तानला नमवत खणखणीत विजयाची नोंद केली. भारताविरुद्ध पराभूत झाल्यास यजमान पाकिस्तानवर प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवू शकते. जवळपास ३० वर्षानंतर पाकिस्तानात आययीसी स्पर्धेचं आयोजन होत आहे.

भारत आणि बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत याआधी केवळ एकदाच आमनेसामने आले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या लढतीत रोहित शर्माच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला होता. पाच फिरकीपटूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाला प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भासणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत अनुभवी मोहम्मद शमीकडे वेगवान माऱ्याची सूत्रं असतील.

भारत-बांगलादेश सामना किती वाजता सुरू होईल?

भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी २.३० वाजता सुरू होईल.

कुठे होणार हा सामना?

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथे हा सामना रंगेल.

मोबाईलवर हा सामना कसा पाहाल?

जिओहॉटस्टारवर तुम्हाला हा सामना पाहता येईल. पण हा सामना पाहण्यासाठी तुम्हाला जिओहॉटस्टारचं सबस्क्रिप्शन घेणं गरजेचं आहे.

टीव्हीवर हा सामना कुठल्या चॅनलवर दिसेल?

स्टार स्पोर्ट्स वाहिनीकडे या स्पर्धेचे प्रक्षेपण हक्क आहेत. त्यामुळे स्टार स्पोर्ट्स१, स्टार स्पोर्ट्स१ एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स १ तामीळ, स्टार स्पोर्ट्स १ तामीळ एचडी, स्टार स्पोर्ट्स १ तेलुगु, स्टार स्पोर्ट्स १ तेलुगु एचडी, स्टार स्पोर्ट्स १ कन्नडा, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २ एचडी, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स खेल या वाहिन्यांवर सामन्याचं प्रक्षेपण पाहता येईल.

जिओच्या स्पोर्ट्स१८ १, स्पोर्ट्स १८ १, स्पोर्ट्स १८ २, स्पोर्ट्स १८ ३ या वाहिनीवरही हा सामना दिसेल.

जिओहॉटस्टारवर सामना पाहण्यासाठी पैसे भरावे लागतील का?

हो. जिओचे ग्राहक असाल किंवा हॉटस्टारचे ग्राहक असाल तरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घेणं आवश्यक आहे. ज्या ग्राहकांकडे हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन आहे त्यांना जिओहॉटस्टारचं सबस्क्रिप्शन मिळेल. तुमच्याकडे आधी जिओ असेल किंवा हॉटस्टार असेल तर ती सेवा सुरू राहील. तुमचा सध्याचा प्लॅन संपण्यासाठी १८ दिवस आहेत तर जिओहॉटस्टारही १८ दिवस सुरू राहील. मात्र त्यानंतर तुम्हाला सबस्क्रिप्शन रिन्यू करावं लागेल. हेच डिस्ने+हॉटस्टार प्लॅन ग्राहकांना लागू आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs bangladesh champions trophy 2025 dubai international cricket stadium when match will start where to watch subscription required for this live streaming details channels mobile live jiohotstar