India vs Bangladesh ICC Cricket World Cup 2023 Highlights: आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्ताननंतर आता भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव केला आहे. अशा प्रकारे टीम इंडियाने सलग चौथा विजय नोंदवला. आता भारताचे ४ सामन्यांत ८ गुण झाले आहेत. मात्र, भारतीय संघ अजूनही गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचेही ४ सामन्यात ८ गुण आहेत, मात्र टीम इंडियापेक्षा चांगल्या नेट रनरेटमुळे किवी संघ अव्वल स्थानावर आहे.

Live Updates

CWC 2023 India vs Bangladesh Highlights in Marathi: आज पुण्यातील एमसीए स्टेडियमवर भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला.

10:44 (IST) 19 Oct 2023
IND vs BAN: दोन्ही संघांचे एकूण एकदिवसीय सामन्यातील रेकॉर्ड

दोन्ही संघांमध्ये एकूण ४० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने ३१ तर बांगलादेशने आठ एकदिवसीय सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. कोलंबो येथे २०२३ च्या आशिया चषक दरम्यान दोघांमधील शेवटचा सामना खेळला गेला होता, जो बांगलादेशने सहा धावांनी जिंकला होता. २०१९ च्या विश्वचषकानंतर उभय संघांमधील हा पाचवा वनडे सामना असेल.

गेल्या चार सामन्यांमध्ये बांगलादेशने तीन आणि भारताने केवळ एकच सामना जिंकला आहे. मात्र, या चार सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. यापैकी तीन सामने २०२२ मध्ये एकदिवसीय मालिकेदरम्यान, शिखर धवन कर्णधार असताना खेळले गेले, तर एक सामना आशिया कप २०२३ दरम्यान खेळला गेला.

CWC 2023 India vs Bangladesh  Highlights Score Updates in Marathi: