जयपूरच्या मैदानामध्ये बुधवारी पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये पाहुण्या संघात एका अशा खेळाडूचा सामावेश होता की ज्याच्या नावामुळे त्याची भारतीय चाहत्यांमध्ये फार चर्चा झाली. या खेळाडूचं नाव त्याच्या कामगिरीपेक्षा अधिक चर्चेत राहिलं तो खेळाडू आहे रचिन रवींद्र.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थात रचिनला या सामन्यामध्ये फारशी संधी मिळाली नाही. मात्र रोहितला बाद करण्यामध्ये त्याने झेल पकडून महत्वाचा वाटा उचलला. १८ व्या षटकामध्ये फलंदाजीला आलेला रचिन मोठा फटका मारण्याच्या नादात ८ चेंडूंमध्ये सात धावा करुन बाद झाला. रचिनच्या खेळापेक्षा भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याच्या नावाची अधिक चर्चा झाली. विशेष म्हणजे त्याच्या नावामागील गोष्ट फार रंजक आहे. अर्थात नावावरुन लक्षात आलं असेल त्याप्रमाणे रचिन हा मूळचा भारतीय वंशाचा खेळाडू आहे.

नक्की पाहा हा व्हिडीओ >> वॉर्नरप्रमाणे दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावण्याचा प्रयत्न त्याला पडला महागात; व्हिडीओ झालाय व्हायरल

आज आहे वाढदिवस…
रचिनचे वडील रवि कृष्णमूर्ती हे सॉफ्टवेअर सिस्टीम आर्किटेक्ट आहेत. बंगळुरु जन्म झालेले रवि आणि त्यांची पत्नी दीपा हे दोघे न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले आहेत. रचिनचा जन्म १९९९ साली न्यूझीलंडमधील वेलिंगटनमध्ये झालाय. आज म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी रचिनचा २२ वा वाढदिवस आहे.

…म्हणून टी-२० विश्वचषकाच्या संघात स्थान नाही
२०२१ मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये रचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. रचिनने बांगलादेशविरोधातील टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. या मालिकेत तो पाच टी-२० सामने खेळला. रचिन हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. बांगलादेशविरोधात त्याने सहा विकेट्स घेतल्या मात्र त्याला पाच सामन्यांमध्ये केवळ ४७ धावा करता आल्या. त्यामुळेच त्याला टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळालं नाही.

नक्की पाहा >> Video: मार्टिन गप्टिलचा No Look Six… चहरने दिलेली खुन्नस अन् पुढच्याच चेंडूवर…

न्यूझीलंडकडून खेळणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू
वयाच्या १६ व्या वर्षीच रचिनने २०१६ च्या आयसीसीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकामध्ये भाग घेतला होता. त्यावेळी रचिन सर्वात कमी वयामध्ये न्यूझीलंडसाठी खेळणारा खेळाडू ठरला होता. रचिन २०१८ साली अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप खेळला आहे. तसेच भारत अ संघाने २०१९-२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान खेळलेल्या सराव कसोटीमध्ये रचिन शुभमन गिलसारख्या खेळाडूंविरोधात खेळलाय.

इंडियन कनेक्शन काय?
रचिनचे वडील रवि हे क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत. तसेच ते भारताचा माजी क्रिकेपटू जवागल श्रीनाथचे चांगले मित्रही आहेत. रवि आणि श्रीनाथ यांनी बंगळुरुकडून स्थानिक स्तरावर काही सामने एकत्र खेळलेत. रचिन श्रीनाथला श्री अंकल असं म्हणतो. अनेकदा ते क्रिकेट या विषयावर गप्पा मारतात, असं रचिनने एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> सकाळी ICU मधून डिस्चार्ज मिळाला अन् संध्याकाळी तो देशासाठी सर्वाधिक धावा करणारा ठरला

रचिन नावाचा अर्थ काय…
रवि आणि त्यांची पत्नी हे भारतीय क्रिकेटचे आणि त्यातही सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे मोठे चाहते आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलाचं नाव रचिन असं ठेवलं आहे. यामधील र हा राहुलमधला आहे तर चिन हे सचिनमधील आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs new zealand meaning of name rachin indian born new zealand batting prodigy rachin ravindra connection with rahul dravid sachin tendulkar scsg