आत्मविश्वास उंचावलेल्या भारताने अखेरच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ४-१ अशी मात करत आपण हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज असल्याचा इशारा दिला.
भारताला पहिल्या सराव सामन्यात अर्जेटिनाकडून १-२ अशी हार पत्करावी लागली होती. दुखापतींचा सामना करत असलेल्या भारतीय संघाने मात्र या सामन्यात परिपक्व खेळ केला. भारताने या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.
भारताने या सामन्यात तीन गोल पेनल्टीकॉर्नरवर लगावले. रुपिंदरपाल सिंगने दोन तर व्ही. आर. रघुनाथने एक गोल केला. कर्णधार सरदारा सिंगने मैदानी गोल करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.