रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत जबरदस्त यश मिळवले. आता भारतीय संघाच्या नजरा श्रीलंकेविरुद्ध याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यावर आहेत. भारत-श्रीलंका तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांसाठी भिडणार आहेत. आज २४ फेब्रुवारीला लखनऊमध्ये टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहली आणि ऋषभ पंत टी-२० मालिकेचा भाग असणार नाहीत. दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. शिवाय दीपक चहर आणि सूर्यकुमार यादव जायबंदी झाले आहेत, त्यामुळे रोहितसमोर कडवे आव्हान असेल. भारताचे अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांना कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. केएल राहुल दुखापतग्रस्त असून पंतलाही विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहला टी-२० आणि कसोटी दोन्ही संघांचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘‘वृध्दिमान साहासारखाच माझ्यावरही अन्याय झाला”, भारताच्या आणखी एका दिग्गज विकेटकीपरनं केला खळबळजनक खुलासा!

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत श्रीलंकेचा संघ दासून शनाकाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर ४ मार्च ते १२ मार्च दरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जातील.

वेळापत्रक

२४ फेब्रुवारी पहिला टी-२० सामना, लखनऊ

२६ फेब्रुवारी दुसरा टी-२० सामना, धर्मशाळा

२७ फेब्रुवारी तिसरा टी-२० सामना, धर्मशाळा

४-८ मार्च पहिली कसोटी, मोहाली

१२-१६ मार्च दुसरी कसोटी, बंगळुरू

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs sri lanka 2022 t20i and test series adn