scorecardresearch

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ६ जून १९८८ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये झाला. त्याचे कुटूंब चंदनपुरी गावामध्ये वास्तव्याला होते. लहानपणी आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये रस असल्याचे अजिंक्यच्या वडिलांनी मधुकर रहाणे यांनी हेरले. अजिंक्य सात वर्षांचा असताना ते त्याला डोंबिवलीतील एका छोट्या कोचिंग कॅम्पमध्ये घेऊन गेले. गावच्या ठिकाणी योग्य प्रशिक्षण उपलब्ध नसल्याने त्यांनी अजिंक्यला शहरामध्ये प्रशिक्षणासाठी नेण्याचे ठरवले. अजिंक्य रहाणे वयाच्या सतराव्या वर्षापासून भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याने डोबिंवलीच्या एस व्ही जोशी हायस्कूल या शाळेतून प्राथमिक शिक्षणही पूर्ण केले.


प्रवीण आम्रे यांच्याकडे प्रशिक्षण घेत असताना लगेचच दोन वर्षांनी अजिंक्यला राज्यस्तरीय पातळीवर क्रिकेट खेळायची संधी मिळाली. २००७ मध्ये अंडर-१९ संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. तेव्हा भारतीय अंडर-१९ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यामध्ये अजिंक्यने दोनदा १०० धावा केल्या. त्याचा चांगला खेळ पाहून मुंबईच्या संघाने सप्टेंबर २००७ मध्ये मोहम्मद निसार ट्रॉफीमध्ये समाविष्ट केले. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने शतकीय कामगिरी केली. पुढे त्याला इराणी ट्रॉफीमध्येही खेळण्याची संधी मिळाली. दुलीप आणि रणजी स्पर्धांमध्येही अजिंक्य रहाणे हे नाव गाजले. अजिंक्य आजही मुंबईच्या संघाकडून क्रिकेट खेळतो.


२०११ मध्ये अजिंक्य रहाणेला भारताच्या कसोटी संघामध्ये सामील करण्यात आले. त्याचदरम्यान टी-२० आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. पण पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी २०१३ पर्यंत थांबावे लागले. २२ मार्च २०१३ रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यामध्ये अजिंक्यने पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत ८३ कसोटी सामन्यांमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये अजिंक्यने २,९६२ धावा केल्या आहेत. तसेच १७४ टी-२० सामन्यामध्ये ६ हजारांपेक्षा जास्त धावा करणारा तो फलंदाज आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही त्याच्याकडे होती. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारताने २०२०-२१ च्या ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. सध्या तो कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. भारताच्या कसोटी संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळतो. २००८-१० या दोन वर्षांमध्ये तो मुंबई इंडियन्स संघात होता. २०११ ते २०१५ या काळात तो राजस्थान रॉयल्सचा भाग होता. गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये त्याला चांगला खेळ करता आला नव्हता. पण २०२३ मध्ये चैन्नई सुपरकिंग्स या संघामध्ये गेल्यानंतर त्याने तुफान फटकेबाजी करत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले.


 


 


Read More
Ajinkya Rahane Credits Rinku Singh Turning Point of match captain Said Rinku innings turned everything
“…तिथे सामना पूर्ण फिरवला”, अजिंक्य रहाणेने टर्निंग पॉईंट सांगत ‘या’ खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय; सामन्यानंतर पाहा काय म्हणाला?

Ajinkya Rahane on Win: अजिंक्य रहाणेने सामन्यानंतर केकेआरच्या या विजयाचं मोठं क्रेडिट खास खेळाडूला दिलं आहे. सामन्यानंतर कॅप्टन काय म्हणाला?…

Cameron Green
KKR Qualification Scenario: लागोपाठ ५ सामने गमावले, पण KKR कडे अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी! करावं लागेल ‘हे’ काम

Kolkata knight Riders Qualification Scenario: आयपीएल २०२६ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघ अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतों. जाणून घ्या कसं…

ajinkya rahane
Ajinkya Rahane: “पराभवानंतर बोलणं सोपं नसतं…” लागोपाठ ५ व्या पराभवानंतर अजिंक्य रहाणे भावूक, म्हणाला…

Ajinkya Rahane On Defeat: कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकाताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या…

ajinkya rahane shubman gill
GT vs KKR: अजिंक्य रहाणेचा ‘तो’ धाडसी निर्णय अंगलट! शुबमन गिलच्या वादळापुढे KKR चा लागोपाठ ५ वा पराभव, शेवटच्या षटकात गुजरातचा विजय

IPL 2026 GT vs KKR: आयपीएल २०२६ च्या २५ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून दणदणीत…

Ajinkya Rahane
CSK vs KKR: तेलही गेलं, तूपही गेलं! CSKकडून हरल्यानंतर अजिंक्य रहाणेवर BCCI ची मोठी कारवाई

Ajinkya Rahane Fined By BCCI: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेवर बीसीसीआयकाढून कारवाई करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं?…

ajinkya rahane
Ajinkya Rahane: लखनौकडून पराभूत होताच अजिंक्य रहाणे संतापला! ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर, म्हणाला…

KKR vs LSG, Ajinkya Rahane Statement: लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान…

Kolkata Knight Riders vs Punjab Kings IPL match | Shreyas Iyer captaincy Punjab Kings | Ajinkya Rahane KKR captain | IPL 2026 cricket updates
IPL 2026 : कोलकाताचे विजयी पुनरागमनाचे ध्येय; ‘आयपीएल’ सामन्यात आज पंजाब किंग्जचे आव्हान

आयपीएलच्या रणसंग्रामात आज कोलकाता नाइट रायडर्सचा सामना लयीत असलेल्या पंजाब किंग्जशी होणार आहे. मुख्य खेळाडूंची अनुपस्थिती आणि कर्णधार बदलाच्या पार्श्वभूमीवर…

ajinkya rahane
Ajinkya Rahane: “लोकांना माझा हेवा वाटतो…”, टीका करणाऱ्यांना अजिंक्य रहाणेचं सडेतोड उत्तर, म्हणाला…

Ajinkya Rahane: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ajinkya rahane
KKR vs SRH: KKR चा पराभव कोणामुळे झाला? अजिंक्य रहाणेने सांगितलं पराभवाचं कारण; सामन्यानंतर म्हणाला…

Ajinkya Rahane On KKR Defeat: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने पराभवानंतर पराभवाचं खापर कोणावर फोडलं? जाणून घ्या.

SRH beat KKR by 65 Runs Kolkata All out on 161 runs in Eden gardens Heinrich Klaasen jaydev unadkat IPL 2026
SRH vs KKR: सनरायझर्सचा केकेआरवर दणदणीत विजय, घरच्या मैदानावर कोलकाता १६ षटकांत ऑलआऊट; कॅप्टन इशानने उघडलं विजयाचं खातं

SRH beat KKR: सनरायझर्स हैदराबादने केकेआरचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव केला आहे. या पराभवासह केकेआरने स्पर्धेतील सलग दुसरा सामना गमावला…

IPL 2026 Cricket Australia Hits out at Ajinkya Rahane on cameron green bowling said KKR know why he is not bowling
MI vs KKR: “KKRला चांगलंच माहितीये ग्रीन बॉलिंग का करत नाहीये”, अजिंक्य रहाणेला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुनावलं; कॅमेरून ग्रीनमुळे पेटला वाद

Cricket Australia slams Ajinkya Rahane: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेला सुनावलं आहे.

संबंधित बातम्या