टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आज वयाच्या २९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करत चहलने थोड्या कालावधीमध्येच भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे. जादुई फिरकीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या चहलला त्याच्या सहकाऱ्यांनी आजच्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.