इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) दुसऱ्या सत्राला ३ ऑक्टोबरला सुरुवात होणार असून पहिला सामना गतविजेत्या अॅटलेटिको दी कोलकाता (एटीके) विरुद्ध यजमान चेन्नईयन एफसी यांच्यात होणार असल्याची घोषणा शुक्रवारी आयोजकांनी केली. पहिल्या सामन्याच्या यजमानपदाचा मान चेन्नईला मिळाला आहे.
या स्पध्रेत ६१ सामने खेळविण्यात येणार असून
२० डिसेंबरला अंतिम लढत होणार आहे. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेला केरला ब्लास्टर एफसी संघ पहिल्या लढतीत घरच्या मैदानावर बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी संघाशी सामना करील. मुंबई सिटी एफसी आपला पहिला सामना पुणे सिटी एफसी संघाविरुद्ध ५ ऑक्टोबरला नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळेल.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2015 रोजी प्रकाशित
गतविजेत्या कोलकाताचा चेन्नईयनशी सामना
इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) दुसऱ्या सत्राला ३ ऑक्टोबरला सुरुवात होणार असून पहिला सामना गतविजेत्या अॅटलेटिको दी कोलकाता (एटीके) विरुद्ध यजमान चेन्नईयन एफसी यांच्यात होणार असल्याची घोषणा शुक्रवारी आयोजकांनी केली.
First published on: 30-05-2015 at 07:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian super league