World Cup 2023, Points Table: विश्वचषकाच्या १२व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा हा सलग आठवा विजय आहे. भारतीय संघ अजून त्यांच्याविरुद्ध हरलेला नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठ्या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचे आता तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. न्यूझीलंडचेही सहा गुण आहेत, मात्र चांगल्या नेट रनरेटच्या आधारे रोहित शर्माचा संघ पहिल्या स्थानावर आहे. भारताचा निव्वळ धावगती +१.८२१ वर पोहोचला. त्याच वेळी, न्यूझीलंडचा निव्वळ रन रेट +१.६०४ आहे. पाकिस्तान चार गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला, परंतु त्यांचा निव्वळ धावगती -०.१३७ वर घसरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये १२ सामने झाले आहेत. सर्व संघांनी किमान दोन ते तीन सामने खेळले आहेत. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंत तीन सामने खेळले असून त्यातील सर्व जिंकले आहेत. आता यजमान भारतासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सोपा आहे, कारण भारताने पहिल्या तीन सामन्यांमध्ये दोन मोठ्या संघांना पराभूत केले आहे. भारताशिवाय न्यूझीलंडनेही पहिले तीन सामने जिंकले आहेत. हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांशिवाय दक्षिण आफ्रिका हा एकमेव संघ आहे ज्याने एकही सामना गमावलेला नाही. हा संघ दोन सामन्यांत दोन विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने इंग्लंड, नेदरलँड आणि बांगलादेशचा पराभव केला असला तरी किवी संघाला स्पर्धेचा दुसरा टप्पा मोठ्या संघांविरुद्ध खेळायचा आहे. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.

हेही वाचा: IND vs PAK: “…घाई करण्याची काय गरज होती?” गावसकर यांनी रोहित शर्माच्या कोणत्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली? जाणून घ्या

दोन विजयानंतर पाकिस्तानला भारताविरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागला आहे. पाकिस्तान चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, पण या संघाचा निव्वळ धावगती आता नकारात्मक झाली आहे. इंग्लंडला दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभव मिळाला असून, हा संघ पाचव्या स्थानावर आहे. तीन सामन्यांत एक विजय आणि दोन पराभवांसह बांगलादेश सहाव्या स्थानावर आहे.

हेही वाचा: IND vs PAK: “दिल-दिल पाकिस्तान…”; भारताकडून पराभवानंतर पाक संघ व्यवस्थापक संचालकाचे बेताल वक्तव्य, म्हणाला, “वाटलं हा ICC-BCCI…”

श्रीलंका, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे संघ असे आहेत ज्यांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत, परंतु त्यांना एकही विजय मिळाला नाही. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्ससाठी गुणतालिकेत तळाला असणे नवीन नाही, पण ऑस्ट्रेलियन संघ नवव्या स्थानावर आहे, हे आश्चर्यकारक आहे. हा स्पर्धेचा जरी प्रारंभिक टप्पा असला तरी गुणतालिकेत बरेच बदल होणार आहेत. मात्र, इतर संघांपेक्षा इथून पुढे भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांना उपांत्य फेरी गाठणे सोपे जाईल.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ गुणतालिका
संघसामनेविजयपराभवगुणनेट रनरेट
भारत+१.८२१
न्यूझीलंड+१.६०४
दक्षिण आफ्रिका+२.३६०
पाकिस्तान-०.१३७
इंग्लंड+०.५५३
बांगलादेश-०.६९९
श्रीलंका-१.१६१
नेदरलँड्स-१.८००
ऑस्ट्रेलिया-१.८४६
अफगाणिस्तान-१.९०७
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias victory chariot moved ahead defeated pakistan in front of one lakh spectators and reached the top of the points table avw