inter milan beat barcelona in champions league zws 70 | Loksatta

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : इंटरची बार्सिलोनावर मात

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंटरने मध्यंतरापूर्वी गोल करीत बार्सिलोनावर आघाडी मिळवली.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : इंटरची बार्सिलोनावर मात

मिलान : पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत हकान चाल्हानोग्लूने झळकावलेल्या गोलच्या जोरावर इंटर मिलानने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या सामन्यात बार्सिलोनावर १-० अशा विजयाची नोंद केली.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरस पहायला मिळाली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंटरने मध्यंतरापूर्वी गोल करीत बार्सिलोनावर आघाडी मिळवली. त्यानंतर इंटरने भक्कम बचाव करीत ही आघाडी अखेपर्यंत राखत विजय नोंदवला.

दुसरीकडे, लिव्हरपूल आणि नापोली संघांनी आपापल्या लढतींमध्ये विजय मिळवला. लिव्हरपूलने रेंजर्सवर २-० अशी मात केली. लिव्हरपूलकडून ट्रेंट अ‍ॅलेक्झांडर-आर्नोल्ड (सातव्या मिनिटाला) आणि मोहम्मद सलाह (५३व्या मि.) गोल केले. लिव्हरपूलच्या बचावफळीसमोर रेंजर्सला एकही गोल झळकावता आला नाही. जिओकोमो रासपादोरीच्या (१८ व ४७व्या मि.) दोन गोलमुळे नापोलीने आयेक्सवर ६-१ असा विजय मिळवला.  तसेच बायर्न म्युनिकने व्हिक्टोरिया प्लाझानला ५-० असे नमवले. त्यांच्याकडून लिरॉय साने (७ व ५०व्या मि.), सर्ज गनाब्री (१३व्या मि.), सादिओ माने (२१व्या मि.) आणि आघाडीपटू एरिक मॅक्सिम चुपो-मोटिंग (५९व्या मि.) यांनी गोल नोंदवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : ऋतिका श्रीरामला दुसरे सुवर्ण

संबंधित बातम्या

IND vs NZ 1st ODI: वॉशिंग्टन सुंदरने मॅट हेन्रीला झोपून लगावला अप्रतिम चौकार, पाहा व्हिडिओ
गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
बादशाहच्या गाण्यावर धोनी आणि पांड्या ब्रदर्सने धरला ठेका, व्हिडिओ होतोय व्हायरल
IND vs NZ ODI Series: न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका तुम्हाला या चॅनलवर live पाहता येणार तेही अगदी निशुल्क
जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा : आनंद, इलामपार्थी यांना जागतिक युवा विजेतेपद

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ट्रॅकवर मुलं बोरं खात बसलेले असतानाच समोरुन ट्रेन आली अन्….; पंजाबमधील ह्रदय पिळवटून टाकणारी घटना
राज ठाकरेंच्या ‘असा महाराष्ट्र कधी पाहिला नाही’च्या टीकेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले “शिवराळ भाषेचा…”
“ईडीच्या नोटिशीनंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’चा…” सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक प्रश्न; म्हणाल्या, “सुपारीबाज आंदोलनं बंद करा!”
विश्लेषण: ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजना काय आहे? शिक्षण-संशोधन संस्थांसाठी ती फायदेशीर कशी?
विश्लेषण : राज्यातील पर्यटन वाढेल?