रोहित शर्माची फलंदाजी पाहिल्यावर मला पाकिस्तानचा महान फलंदाज इन्झमाम उल हकच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण होते, असे भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने सांगितले.
धडाके बाज सलामीवीर म्हणून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वत:चे नाव अधोरेखित करणाऱ्या उपकर्णधार रोहितने जून २००७ मध्ये एकदिवसीय पदार्पण केले. मग त्याच वर्षांच्या उत्तरार्धात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध त्याने ट्वेन्टी-२० पदार्पण केले. परंतु पहिल्या सामन्यात रोहितला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. अन्य फलंदाजांप्रमाणेच आपल्या भात्यामधील दिमाखदार फटके खेळण्यासाठी रोहित पुरेसा वेळ घेईल, असे प्रथमदर्शनी वाटते. त्यामुळेच रोहितच्या फलंदाजीत मला इन्झमामची आठवण होते, असे युवराजने सांगितले.