कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे ४ आणि ६ मेला बंगळरूमध्ये होणारे आयपीएलचे सामने अन्यत्र हलवण्याची शक्यता आहे. हे सामने कुठे होतील यासंदर्भातला निर्णय लवकरच घेतला जाईल असे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटक विधानसभा निवडणुका ५ मेला होणार आहेत तर दुसऱ्या दिवशी अर्थात ६ मेला मतमोजणी होणार आहे. ४ मेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा किंग्स इलेव्हन पंजाबशी तर ६मेला सनरायझर्स हैदराबादशी मुकाबला होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2013 2 matches could be shifted out of bangalore due to assembly elections