IPL 2019 RR vs KXIP : सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाबाने राजस्थानवर १४ धावांनी विजय मिळवला. सामन्यावर राजस्थानचे वर्चस्व होते. मात्र, बटलर धावबाद झाला आणि सामन्याला कलाटणी मिळाली. सामना पंजाबच्या बाजून झुकला. मंकड पद्धतीने पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने बटलरला बाद केले. त्यामुळे अश्विनच्या खिलाडूवृत्तीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वत: बटलरलाही अश्विनने केलेला हा प्रकार आवडला नाही हे त्याने मैदानावरच दाखवून दिले. सामन्यानंतर अश्निनने यावर स्पष्टीकरण दिले आहे. बटलरला धावबाद करून काही चुकीचे केले नाही. मला हे नाही समजत की, यात अखिलाडूवृत्ती कुठे आली. असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सामन्यानंतर मंडक आणि खिलाडूवृत्तीवर उपस्थित झालेल्या वादावर अश्विनला विचारले असता तो म्हणाला की, ‘बटलरला मंडक पद्धतीने बाद करण्याची कोणतीही योजना नव्हती. असे क्षण सामन्याला कलाटणी देणारे ठरतात. त्यामुळे फलंदाजांनी सावध रहायला हवे. क्रिकेटच्या नियमाप्रमाणे बटलरा बाद केले आहे. यामध्ये अखिलाडूवृत्ती कुठे येते. लोक सोशल मीडियावर टीका करत आहेत. बटलरला नियमाप्रमाणे धावबाद केले आहे आणि यात मी काही चुकीचे केले नाही.’ आयपीएलच्या इतिहासत मंकड पद्धतीने बाद होणारा बटलर पहिला फलंदाज ठरला आहे.
“My actions were within cricket’s rules, can’t be called unsporting.”
– @ashwinravi99 responds to accusations of him unfairly running out @josbuttler. #RRvKXIP #VIVOIPL pic.twitter.com/ygOmyGTzCL— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2019
काय आहे मंकड नियम –
क्रिकेटच्या 41.16 नियमानुसार, नॉन-स्ट्राईकर फलंदाज गोलंदाजाने चेंडू टाकल्याशिवाय क्रिज सोडू शकत नाही. जर फलंदाजाने क्रिज सोडले आणि त्याचवेळी गोलंदाजाने चेंडू यष्ट्याला लावला तर बाद दिले जाते.
नक्की काय झाले
सामन्याच्या १३ व्या षटकामध्ये 69 धावांवर खेळणारा बटलर नॉन स्ट्रायर्स एण्डला होता. गोलंदाजी करणाऱ्या अश्विनने चेंडू टाकण्याआधी नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांवरील बेल्स उडवल्या. ज्यावेळी अश्वीनने बेल्स उडवल्या तेव्हा बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर होता. अश्विनने अपील केल्यानंतर पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे सोपवला. तिसऱ्या पंचांनीही मंकड नियमाप्रमाणे बटलरला बाद ठरवले. बटलर धावबाद झाल्यानंतर राजस्थान संघाची पडझड झाली आणि ते सामना १४ धावांनी हरले.
