वानखेडे मैदानावरील सामन्यात मुंबईच्या कायरन पोलार्डने क्षेत्ररक्षणादरम्यान, सुरेश रैनाचा थरारक झेल पकडत सर्वांना धक्क करुन सोडलं आहे. 171 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अंबाती रायुडू, शेन वॉटसन झटपट माघारी परतले. यानंतर सुरेश रैना आणि केदार जाधवने छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – IPL 2019 : मुंबईविरुद्ध सामन्यात DJ Bravo चमकला, चेन्नईकडून बळींचं शतक

रैनाने मुंबईच्या गोलंदाजीवर चांगला हल्लाबोल चढवला. जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर सुरेश रैनाने उंच फटका खेळला. हा फटका थेट सीमारेषेबाहेर जाणार असं सर्वांना वाटत असतानाच, कायरन पोलार्डने उडी मारत एका हाताने झेल पकडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

पोलार्डने झेल पकडल्यानंतर वानखेडे मैदानात मुंबईच्या पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला. खुद्द सुरेश रैनालाही पोलार्डने घेतलेल्या या कॅचवर काही क्षण विश्वास बसला नाही. सुरेश रैनाने 16 धावांची खेळी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 mi vs csk kiren pollard took stunner catch of suresh raina watch video