भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली. चंद्रापासून २.१ कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर विक्रम लँडरचा पत्ता लागला. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने हे ठिकाण शोधून काढले. ट्विटरवरून या संदर्भात देण्यात आली आहे.

“बघतेच, तुला रात्रीचं जेवण कसं मिळतं…”; युवराजला पत्नीचा इशारा

नासाच्या ऑर्बिटरला चंद्राच्या भूपृष्ठावर विक्रमचे अवशेष सापडले. अमेरिकेच्या नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने पाठवलेल्या चांद्रयान – २ मोहिमेतील विक्रम लँडरचे अवशेष शोधले. नासाने याचे श्रेय चेन्नईचा इंजिनिअर शनमुगा सुब्रमण्यम याला दिले आहे. सुब्रमण्यम याने सर्वात प्रथम विक्रमला शोधून काढले होते. नासाच्या या शोध मोहिमेनंतर आता इंडियन प्रिमअर लीग म्हणजेच IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ISRO ला एख विचित्र अशी विनंती केली आहे.

IPL 2020 : १९ तारखेला लिलाव प्रक्रिया; जाणून घ्या कोणत्या देशाचे किती खेळाडू मैदानात

नासाद्वारे विक्रम लँडरचा शोध लागल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी ISRO चे अभिनंदन केले. त्याशिवाय त्याने एक विनंतीदेखील केली आहे. आमच्या संघातील फलंदाजांकडून एक विनंती आहे. नासातील ज्या टीमने विक्रम लँडरचा शोध लावला, ते आमचे फलंदाज एबी डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली यांनी मारलेले चेंडू शोधून देतील का? जर त्यांना हरवलेले चेंडू चंद्रावर सापडले तर कृपया त्यांनी ते चेंडू त्या दोघांनी परत करावेत, अशी विनंती RCB ने केली आहे.

RCB ने एक छोटासा व्हिडीओ पोस्ट करून तशी विनंती केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूपच आवडला असून हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.