आयपीएल २०२१च्या ५३व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा सहज फडशा पाडत विजय मिळवला. पंजाबचा कप्तान केएल राहुलने ९८ धावांची स्फोटक खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला. राहुल सामन्यात स्टार ठरला असला, तरी सामन्यानंतर धोनीसेनेच्या खेळाडूने भर मैदानात आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहरने आपल्या प्रेयसीला प्रपोज केले. सामन्यानंतर बक्षीस वितरण संमारभाच्या आधी दीपक स्टँड्समध्ये गेला, आणि त्याने प्रेक्षकांसमोर जया भारद्वाज हिला प्रपोज केले. दीपकची ही गोष्ट पाहून त्याची गर्लफ्रेंडली खूश झाली आणि तिने दीपकला होकार दिला. दीपकने प्रपोज करतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा – राहुल…नाम तो सुना होगा! एका सामन्यात पंजाबच्या कप्तानानं दोघांकडून काढून घेतली ऑरेंज कॅप

पंजाबचा चेन्नईवर विजय

आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाबने चेन्नईला ६ गडी आणि ६ षटके राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने पंजाबला विजयासाठी १३५ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात पंजाबचा कप्तान केएल राहुलने ४२ चेंडूत नाबाद ९८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीत ७ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. या विजयासह पंजाबचे गुणतालिकेत १२ गुण झाले असून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. असे असले तरी साखळी फेरीतील पंजाबचे सर्व सामने संपले असून कोलकाता आणि मुंबई यांचा प्रत्येकी एक सामना उरला आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी सामना गमवल्यास कोलकाता, मुंबई, राजस्थान आणि पंजाबचे प्रत्येकी १२ गुण होतील आणि धावगतीवर चौथ्या संघाची प्लेऑफमध्ये निवड होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 csk pacer deepak chahar proposes girlfriend at stadium after match against pbks adn