कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका मे महिन्यात होणार असल्यामुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील काही सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
बंगळुरु येथे ४ व ६ मे रोजी रॉयल चॅलेंजर्सचे सामने होणार होते. मात्र त्याच काळात तेथे विधानसभेकरिता मतदान होणार असल्यामुळे काही सामन्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत बदल करण्यात आला आहे. ४ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात होणारा सामना आता १४ मे रोजी घेण्यात येणार आहे. ६ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स व सनराईज हैदराबाद यांच्यातील सामना ९ एप्रिल रोजी होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब व दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात २३ एप्रिल रोजी मोहाली येथे होणारा सामना १६ मे रोजी धरमशाळा येथे होईल. किंग्ज इलेव्हन व रॉयल चॅलेंजर्स यांच्यात १६ मे रोजी धरमशाळा येथे होणारा सामना ६ मे रोजी मोहाली येथे होईल.
दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग्ज इलेव्हन यांच्यात १३ मे रोजी होणारा सामना दिल्ली येथे २३ एप्रिल रोजी आयोजित केला जाणार आहे. कोलकाता नाईटरायडर्स व पुणे वॉरियर्स यांच्यात रांची येथे १४ मे ऐवजी १५ मे रोजी सामना खेळविला जाईल तर चेन्नई सुपरकिंग्ज व दिल्ली डेअरडेव्हिल्स हा सामना १६ मेऐवजी १४ मे रोजी धरमशाळा येथे घेतला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स व चेन्नई सुपरकिंग्ज हा सामना १९ मे ऐवजी १८ मे रोजी बंगळुरु येथे होणार आहे. पुणे वॉरियर्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स हा सामना १८ मेऐवजी १९ मे रोजी पुण्यात दुपारी चार वाजता सुरू होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl time table changed