Gautam Gambhir Argument With Umpire : आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात शुक्रवारी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला, ज्यामध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या सामन्यात कोलकाताने पंजाबवर ८ गडी राखून ऐतिहासिक विजय. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २६१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबने हे लक्ष्य १८.४ षटकांत २ गडी गमावून पूर्ण केले. दरम्यान या सामन्यात केकेआरचा मार्गदर्शक गौतम गंभीर अंपायरशी भिडला होता. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर फोर्थ अंपायरशी वाद घालताना दिसला. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, ही घटना कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील १४व्या षटकात घडली. राहुल चहर १४व्या षटकात पंजाब किंग्जसाठी गोलंदाजी करायला आला. या १४व्या षटकात राहुल चहरच्या शेवटच्या चेंडूवर आंद्रे रसेलने कव्हरच्या दिशेने कट शॉट खेळला. त्यानंतर पंजाब किंग्जचा क्षेत्ररक्षक आशुतोष शर्माने चेंडू घेतला आणि तो यष्टीरक्षक जितेश शर्मापासून थोडा दूर फेकला. यादरम्यान व्यंकटेश अय्यर आणि आंद्रे रसेल यांनी एक धाव घेतली, पण मैदानावरील अंपायरने तो डेड बॉल घोषित केला.

मैदानावरील अंपायरने डेड बॉल दिल्याने केकेआर संघाला एक धाव मिळाली नाही. कारण चेंडू टाकण्यापूर्वीच मैदानावर उपस्थित अंपायरने ओव्हर संपल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे तो डेड बॉल घोषित झाला. मैदानावरील अंपायरच्या या निर्णयानंतर केकेआर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरचा पारा चढला. यानंतर गौतम गंभीर डगआऊटमधून फोर्थ अंपायरकडे गेला आणि या निर्णयाला विरोध करू लागला. यादरम्यान गौतम गंभीरही चांगलाच संतापलेला दिसला. ज्यामुळे केकेआर संघाला एक धाव तर मिळाली नाही, मात्र गौतम गंभीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हेही वाचा – LSG vs RR : राजस्थानविरुद्ध वेगवान गोलंदाज मयंक यादव खेळणार की नाही? एलएसजीचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणाले…

टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग –

जॉनी बेअरस्टो (नाबाद १०८) च्या शानदार शतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील २६१ धावांचा पाठलाग केला. त्याचबरोबर ८ विकेट्सनी विजय मिळवत सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विश्वविक्रम केला. पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी २६२ धावांचे लक्ष्य १८.४ षटकांत २४ षटकारांसह पूर्ण केले. जॉनी बेअरस्टोने ४८ चेंडूत नाबाद खेळी खेळली आणि त्याला शशांक सिंगची (२८ चेंडूत नाबाद ६८ धावा) पूर्ण साथ मिळाली. प्रभसिमरन सिंगने अवघ्या २० चेंडूत ५४ धावा केल्या. तत्पूर्वी, सुनील नरेन (७१) आणि फिल सॉल्ट (७५) यांच्या पहिल्या विकेटसाठी केलेल्या वेगवान भागीदारीमुळे केकेआरने ६ गडी गमावून २६१ धावा करत आपली दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir arguing with 4th umpire during kkr vs pbks live match video goes viral in ipl 2024 vbm