अफलातून ग्लेन मॅक्सवेल! एका हाताने टिपला भन्नाट झेल; शुभमन गिल अवघी १ धाव करुन तंबुत परतला

नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

glenn maxwell
ग्लेन मॅक्सवेलने अशा प्रकारे झेल टिपला. (फोटो-iplt20.com)

आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या लढतीत बंगळुरु संघाला विजय अनिवार्य असल्यामुळे या संघाचे खेळाडू पूर्ण ताकतीने प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला गोलंदाजीसाठी आलेला हा संघ चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसतेय. या संघातील खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने तर एका हाताने भन्नाट झेल टिपाल आहे.

हेही वाचा >> बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय, आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या वेळेत बदल; ‘हे’ आहे कारण

नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरुवातीपासून गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या बंगळुरु संघाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसले. गुजरातकडून वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल ही जोडी सलामीला आली. मात्र ही जोडी मैदानात जास्त काळासाठी तग धरु शकली नाही. गुजरातच्या २१ धावा झालेल्या असताना शुभमन गिलला झेलबाद व्हावं लागलं. कारण बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेलने एकाच हाताने त्याचा भन्नाट झेल टिपला.

हेही वाचा >> आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सर्वात यशस्वी ठरलेले ‘हे’ तीन संघ स्पर्धेतून बाहेर

जोश हेझलवूडने टाकलेल्या चेंडूला शुभमन गिलने हलक्या हाताने टोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षेत्ररक्षणासाठी स्लीपमध्ये उभा असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने चपळाई दाखवली. त्याने हवेत झेप घेत एका हातने शुभमन गिलचा झेल टिपला. त्याने अनपेक्षितपणे झेल टिपल्यामुळे गिलला फक्त एक धाव करुन तंबुत परतावं लागलं.

हेही वाचा >> IPL 2022 : “तो हिरो बनू शकला असता पण…”; रिंकू सिंहबद्दल कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केले मत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे प्लेइंग इलेव्हन

विराट कोहली, फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल, जोश हेझलवूड

हेही वाचा >> रिंकू सिंहने सांगितली कठीण काळातील आठवण, म्हणाला ‘वडील २-३ दिवस जेवले नव्हते,’ कारण…

गुजरात टायटन्स संघाचे प्लेइंग इलेव्हन

वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Glenn maxwell takes catch of shubman gill by one hand in rcb vs gt ipl 2022 match prd

Next Story
रिंकू सिंहने सांगितली कठीण काळातील आठवण, म्हणाला ‘वडील २-३ दिवस जेवले नव्हते,’ कारण…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी