scorecardresearch

Premium

रिंकू सिंहने सांगितली कठीण काळातील आठवण, म्हणाला ‘वडील २-३ दिवस जेवले नव्हते,’ कारण…

रुिंकू सिंहला दुखापतीमुळे सहा ते सात महिने क्रिकेटपासून दुर राहावे लागले होते.

RINKU SINGH
रिंकू सिंह (संग्रहित फोटो)

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा खेळाडू रिंकू सिंहने लखनऊ सुपर जायंट्सविरोधात खेळताना १५ चेंडूमध्ये ४० धावा केल्या. या धमाकेदार कामगिरीमुळे त्याचे अभिनंदन केले जात आहे. दरम्यान एकीकडे कौतुकाचा वर्षाव होत असताना रिंकू सिंहने त्याच्या खडतर प्रवासाबद्दल सांगितले आहे. क्रिकेट खेळताना दुखापत झाल्यामुळे माझे वडी दोन ते तीन दिवस जेवले नव्हते अशी दुखद आठवण रिंकू सिंहने सांगितली आहे.

हेही वाचा >>> बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय, आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या वेळेत बदल; ‘हे’ आहे कारण

विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत असताना रिंकू सिंहच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला सहा ते सात महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. याबाबत बोलताना “चांगले क्रिकेट खेळण्यासाठी मी कसून प्रशिक्षण घेतले होते. मला क्रिकेटपासून दूर राहावे लागेल असा विचार केकेआर संघाने कधीच केले नव्हता. मागील वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना मला दुखापत झाली. त्यामुळे ते वर्ष माझ्यासाठी चांगलेच कठीण ठरले होते. मी पडलो होतो तेव्हा सर्वप्रथम माझ्या मनात आयपीएलचा विचार आला होता. नंतर माझ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे मला सांगितले गेले. तसेच सहा ते सात महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचेही सांगितले गेले,” असे तो म्हणाला.

हेही वाचा >>> आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सर्वात यशस्वी ठरलेले ‘हे’ तीन संघ स्पर्धेतून बाहेर

तसेच पुढे बोलताना क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर त्याच्या वडिलांची काय स्थिती होती याबद्दलही त्याने सांगितले. “क्रिकेटपासून दूर राहावे लागणार असल्यामुले मी दु:खी होतो. माझे वडीलदेखील दोन ते तीन दिवस जेवले नव्हते. ही छोटीशी जखम असून हा क्रिकेट खेळाचा एक भाग आहे, असे मी त्यांना सांगितले. मी एकमेव कमावणारा व्यक्ती आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर थोडी चिंता लागतेच. मी या कळात दु:खी होतो. मात्र स्वत:वर विश्वास असल्यामुळे मी लवकर बरा झालो,” असे रिंकू सिंह म्हणाला.

हेही वाचा >>> IPL 2022 : “तो हिरो बनू शकला असता पण…”; रिंकू सिंहबद्दल कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केले मत

तसेच केकेआर फ्रेंचायझीने त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दलही त्याने सांगितले. रिंकू सिंगला २०१८ साली केकेआरने खरेदी केले होते. तेव्हापासून तो या संघाचा भाग आहे. या संघाने त्याच्यावर चांगला विश्वास दाखवलेला आहे. “पाच वर्षे माझ्यासाठी खूपच कठीण होते. केकेआरने मला खरेदी केले, त्याच वर्षी मला खेळण्याची संधी देण्यात आली. मात्र त्या हंगामात मी चांगला खेळ करु शकलो नाही. तरीदेखील केकेआरने माझ्यावर विश्वास ठेवला. फ्रेंचायझीने मला रिटेन केले,” असे म्हणत त्याने संघाचे धन्यवाद मानले.

हेही वाचा >>> LSG vs KKR : ९ मॅचनंतर संधी मिळालेल्या एव्हिन लुईसनचा झेल ठरला ‘टर्निंग पॉइंट’; केकेआरकडून सामना घेतला हिसकावून

दरम्यान, १८ मे रोजी लखनऊ आणि केकेआर यांच्यात झालेल्या सामन्यात रिंकू सिंहने नेत्रदीपक कामगिरी केली. संघ अडचणीत असताना त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये ४० धावा करत लखनऊला जेरीस आणले होते. मात्र या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभव झाला. रिंकू सिंहच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: My father didnt eat for 2 3 days said rinku singh remembered his struggle and serious injury prd

First published on: 19-05-2022 at 18:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×