Legend Cricketers Recreate Yuzvendra Chahal’s Iconic Pose Viral Video : राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू आणि टीम इंडियाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी दिग्गज खेळाडू ड्वेन ब्रावोला मागे टाकत इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम चहलच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केल्यानंतर चहलने हरभजन सिंग, एस श्रीसंत आणि मोहम्मद कैफ या माजी खेळाडूंसोबत संवाद साधला. यावेळी हरभजनने चहलच्या एका विशेष गोष्टीवर लक्ष वेधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टार स्पोर्ट्सवर चर्चा सुरु असताना हरभजनने चहलला सांगितलं की, तुझ्या खास पोजची आम्हाला आठवण झालीय. त्यानंतर स्टूडिओत असलेल्या सर्व दिग्गज खेळाडूंनी चहलसारखी पोज दिली. या सर्व क्रिकेटर्सना पोज देताना पाहिल्यानंतर चहलनेही मैदानात तशीच पोज दिली. चहलने ईडन गार्डनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या विरोधात झालेल्या सामन्यात इतिहास रचला. चहलने या सामन्यात १८४ वा विकेट घेऊन आयपीएलमध्ये नवीन विक्रमाला गवसणी घातली.

नक्की वाचा – India vs Pakistan, World Cup 2023 : ठरलं! ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये पहिली लढत

इथे पाहा व्हिडीओ

चहलने केकेआरचा कर्णधार नितीश राणाला स्वीप शॉट मारण्यासाठी मजबूर केलं. त्यानंतर डीप स्वेअर लेगवर शिमरन हेटमायरने राणाचा झेल पकडला. हा विकेट मिळाल्यानंतर चहलने ड्वेन ब्रावोचा आयपीएलमध्ये १८३ विकेट घेण्याचा विक्रम मोडला. पीयुष चावला (१७४), अमित मिश्रा (१७२) आणि रविचंद्रन आश्विन (१७१) यांनीही आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट घेत चमकदार कामगिरी केली आहे. चहलने या सामन्यात एकूण ४ विकेट घेतल्या. त्यामुळे चहलच्या नावावर १८७ विकेट्सची नोदं झाली आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh s sreesanth mohammad kaif recreate yuzvendra chahals iconic pose after he makes new ipl record video viral kkr vs rr nss