दहा वर्षे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) नव्या दमाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपरकिंग्जचं पुनरागमन होत असल्याने त्याची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज (शनिवारी) आयपीएलच्या ११व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. त्यापूर्वी या ‘येलो ब्रिगेड’नं त्यांचा अँथम साँग प्रदर्शित केला आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओत कर्णधार एम.एस. धोनीचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंसोबत धोनी ‘व्हिसल पोडू’च्या तालावर नाचताना पाहायला मिळत आहे. ‘व्हिसल पोडू’ हा चेन्नई सुपरकिंग्जचा अँथम साँग असून चाहत्यांमध्ये तो विशेष लोकप्रिय आहे. CSKच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यानंतर गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या दर्जेदार खेळाचा मनमुराद आस्वाद लुटला जाणार आहे. यजमान मुंबईच्या कामगिरीपेक्षा दोन वर्षांनंतर लीगमध्ये खेळणाऱ्या चेन्नईकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 ms dhoni stars in csk new whistle podu anthem