मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे. वानखेडे स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. रिलायन्स समूहाकडे या संघाची मालकी आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या चार हंगामांमध्ये सचिन तेंडुलकर यांनी या संघाचे नेतृत्त्व केले. या वर्षांमध्ये उत्तमोत्तम खेळाडू असूनही संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. पुढे २०१३ च्या लिलावामध्ये त्यांनी रोहित शर्मावर बोली लावून संघामध्ये घेतले. पुढे त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रोहित शर्मा आल्यावर २०१३ मध्ये मुंबईचा संघ पहिल्यांदा आयपीएल विजेता बनला. त्यानंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षांमध्ये मुंबईच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सने दोन वेळा चॅम्पिअन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे. २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने खराब कामगिरी केली. गुणतालिकेमध्ये संघ शेवटच्या स्थानावर होता. कमबॅक करणारा संघ अशी मुंबई इंडियन्सची ओळख असल्याने यंदाच्या हंगामामध्ये ते चांगला खेळ करतील असा चाहत्यांना विश्वास आहे.Read More
World Cup 2023: चांद्रयान-३च्या यशस्वी लँडिंगनंतर, आयपीएल फ्रेंचाइजी मुंबई इंडियन्सने टीम इंडिया २०२३चा विश्वचषक जिंकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी…
Mumbai Indians Player: मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या एका स्टार खेळाडूला प्रथमच वनडे आणि टी-२० संघात स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या…
Rohit Sharma Income Updates: रोहित शर्माच्या कलेक्शनमध्ये अनेक वाहनांचा समावेश आहे. त्यांचे मुंबईत ४ बीएचके अपार्टमेंटही आहे. रोहितची कमाई करोडोंमध्ये…