आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग तीन पराभवांमुळे टीकेचं धनी बनलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबवर १० गडी राखून मात केली. विजयासाठी आवश्यक असलेल्या १७९ धावा चेन्नईने सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस यांच्या जोरावर पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाजांनी संपूर्ण सामन्याच वर्चस्व गाजवत पंजाबच्या गोलंदाजांना एकही यश मिळू दिलं नाही. वॉटसनने नाबाद ८३ तर डु-प्लेसिसनेही नाबाद ८७ धावांची खेळी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महत्वाची गोष्ट म्हणजे या विजयासह चेन्नईच्या संघासोबत आणखी एक योगायोग जुळून आला आहे. आयपीएलच्या २०१३ सालच्या हंगामात चेन्नईने स्पर्धेतला १२ वा सामना खेळत असताना पंजाबवर अशाच पद्धतीने १० गडी राखून मात केली होती. मोहालीच्या आय.एस.बिंद्रा मैदानावर हा सामना खेळवण्यात आला होता. पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करताना १३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईकडून मुरली विजय आणि मायकल हसी यांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं.

चेन्नईच्या दृष्टीकोनातून आजचा सामना हा खूप आश्वासक ठरला. गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरणाऱ्या शेन वॉटसनला या सामन्यात सूर गवसला. वॉटसनने आपल्या अर्धशतकी खेळीत ११ चौकार आणि ३ षटकार लगावले. याव्यतिरीक्त चेन्नईच्या गोलंदाजांनीही अखेरच्या षटकांत दमदार पुनरागमन करत पंजाबला १७८ धावांवर रोखण्यात यश मिळवलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : ठोकर खाऊनच माणूस ‘ठाकूर’ बनतो! सेहवागकडून मराठमोळ्या शार्दुलचं कौतुक

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 csk thrash kxip by 10 wickets history repeats after 7 years psd