Dream11 IPL 2020 UAE: करोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या IPL स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली. स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सलामीच्या सामन्यात चेन्नईच्या महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघात वॉटसन, फाफ डू प्लेसीस, सॅम करन आणि लुंगी एन्गीडी या चार परदेशी खेळाडूंना स्थान मिळालं, तर मुंबईच्या संघाकडून क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, जेम्स पॅटिन्सन आणि ट्रेंट बोल्ट या चार परदेशी खेळाडूंना संधी देण्यात आली.
मुंबईच्या संघाकडून आणखी एका खेळाडूला संधी मिळाली, तो खेळाडू म्हणजे सौरभ तिवारी. दीर्घकाळा नंतर त्याला IPLमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. त्याने संधीचं सोन करत दमदार फलंदाजी केली. त्याने यंदाच्या हंगामातील पहिला षटकार खेचण्याचा बहुमान पटकावला. त्याने जाडेजाच्या गोलंदाजीवर दमदार षटकार लगावला.
पाहा तो षटकार-
हाच खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न त्याने केला पण फटकेबाजी करण्याच्या नादात तो बाद झाला. दमदार फलंदाजी करणाऱ्या सौरभ तिवारीचा सीमारेषेवर डु प्लेसिसचा अप्रतिम झेल टिपला आणि सौरभ तिवारी बाद झाला. त्याने ३१ चेंडूत ४२ धावा केल्या.