किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात राजस्थान रॉयल्सने शारजाच्या मैदानात विक्रमाची नोंद केली. आयपीएलच्या इतिहासातली सर्वोच्च धावसंख्येचा राजस्थानने यशस्वी पाठलाग केला. २२४ धावसंख्येचा पाठलाग करताना एका क्षणाला राजस्थानने स्मिथ, सॅमसन, उथप्पा अशा महत्वाच्या फलंदाजांना गमावलं होतं. परंतू राहुल तेवतियाने संयम राखत शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर ५ षटकार खेचत सामन्याचं चित्रच पालटलं.
यानंतर ४ गडी राखून राजस्थानने सामना जिंकला. ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर सेलिब्रेशनदरम्यान तेवतियाने शेल्डन कोट्रेलच्या ट्रेडमार्क सेलिब्रेशन स्टाईलची नक्कल करत आपला आनंद साजरा केला.
तेवतियाव्यतिरीक्त संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनीही राजस्थाकडून आश्वासक खेळी केली. पंजाबच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत यॉर्कर चेंडू न टाकल्याचा त्यांना फारमोठा फटका बसला. सोशल मीडियावरही दिवसभर क्रिकेटप्रेमी आणि माजी खेळाडू तेवतियाच्या खेळीचं कौतुक करत आहेत.
अवश्य वाचा – IPL 2020 : तेवतियाच्या ५ षटकारांनी फिरला सामना, गेलच्या विक्रमाशी बरोबरी