आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. देवदत पडीकल या नव्या दमाच्या खेळाडूने आपल्या पहिल्याच सामन्यात खेळत असताना हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अर्धशतकी खेळी केली. पडीकलने फिंचसोबत पहिल्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. स्थानिक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यामुळे पडीकलला यंदा RCB च्या संघात स्थान मिळालं होतं. आपल्याला मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घेत पडीकलने ४२ चेंडूत ८ चौकारानिशी ५६ धावा केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – IPL 2020 : RCB ची प्रयोगशाळा, तेराव्या हंगामात नवीन जोडीला दिली संधी

यासोबतच देवदत पडीकल आयपीएलच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा दुसरा तरुण खेळाडू ठरला आहे. पडीकलने शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकलं आहे.

आयपीएलच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारे तरुण खेळाडू –

१) श्रीवत्स गोस्वामी (२००८) – १९ वर्ष १ दिवस

२) देवदत पडीकल (२०२०)* – २० वर्ष ७६ दिवस

३) शिखर धवन (२००८) – २२ वर्ष १३६ दिवस

४) डेव्हिड वॉर्नर (२००९) – २२ वर्ष १८७ दिवस

फिंच आणि पडीकलच्या भागीदारीमुळे बंगळुरुच्या संघाने हैदराबादविरुद्ध आश्वासक सुरुवात केली. फिंचनेही पडीकलला चांगली साथ दिली. ही जोडी मोठी भागीदारी करणार असं वाटत असतानाच विजय शंकरने पडीकलचा त्रिफळा उडवत हैदराबादला पहिलं यश मिळवून दिलं.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 rcb vs srh devdutt padikal becomes second youngest player to score half century in ipl debute psd