IPL 2022 LSG vs RCB Eliminator : आज लखनऊ-बंगळुरु आमनेसामने, कोणाचे आव्हान संपुष्टात येणार? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

Lucknow Super Giant vs Royal challengers Bangalore Playing XI : राजस्थान आणि गुजरात टायटन्स यांच्या लढतीत गुजरातने विजय मिळवून थेट फायनलमध्ये धडक मारली

LSG vs RCB Eliminator Playing XI
LSG vs RCB Eliminator Playing XI

IPL 2022 LSG vs RCB Playing XI : क्वॉलिफाय-१ मध्ये विजय मिळवून गुजरात टायटन्स संघाने फायनलमध्ये धडक मारल्यानंतर आज एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून क्वॉलिफाय-२ सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाशी दोन हात करण्यासाठी हे दोन्ही संघ आज पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहेत.

हेही वाचा >> IPL 2022, GT vs RR : राजस्थानचा सापळा यशस्वी! चोरटी धाव घेताना शुभमन गिल झाला खास पद्धतीने धावबाद

काल झालेल्या राजस्थान आणि गुजरात टायटन्स यांच्या लढतीत गुजरातने विजय मिळवून थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यानंतर आजच्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यामधील विजयी संघाला क्वॉलिफायर-२ सामन्यात राजस्थानशी दोन हात करावे लागतील. तर पराभूत संघ या स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे बंगळुरु आणि लखनऊ यांच्यात आजचा सामना म्हणजे करो या मरोची लढाई आहे.

हेही वाचा >> IPL 2022, GT vs RR : गुजरातची फायनलमध्ये धडक! राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय

आजच्या सामन्यातील दोन्ही संघ तूल्यबळ आहेत. त्यामुळे आजची लढत चांगलीच संघर्षपूर्ण होणार आहे. लखनऊ संघाकडे केएल राहुल हा दिग्गज फलंदाज आहे. त्याने या हंगामात शतकी खेळी करुन दाखवलेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही तो तळपेल अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडे एव्हिन लुईस, दीपक हुडा,  मार्कस स्टॉइनिस यांच्यासारखे दिग्गज फलंदाज लखनऊकडे आहेत. तसेच या हंगामात मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करुन दाखवलेली आहे. त्यामुळे बंगळुरुला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.

हेही वाचा >> IPL 2022, GT vs RR : क्वॉलिफायर-१ मध्ये संजू सॅमसनच्या नावावर नवा विक्रम, धोनीला टाकलं मागे

तर दुसरीकडे बंगळुरु संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सूर गवसला आहे. त्याने गुजरात टायटन्सविरोधात खेळताना ७३ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातही तो चांगली कामगिरी करेल अशी संघाला अपेक्षा आहे. तसचे कोहलीसोबतच फॅफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे दिग्गज फलंदाज बंगळुरुकडे आहेत. दिनेश कार्तिकसारखा फिनिशरदेखील बंगळुरुच्या ताफ्यात आहे. तसेच गोलंदाजी विभागात जोस हेझलवूड, वानिंदू हसरंगा या गोलंदाजांची फळी बंगळुरु संघाकडे आहे. त्यामुळे लखनऊच्या खेळाडूंना बंगळुरुला नमवण्यास चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा >> महिला टी-२० चॅलेंज : महाराष्ट्राची माया सोनवणे तळपली, गोलंदाजी ठरतेय चर्चेचा विषय; पाहा व्हिडीओ

लखनऊ सुपर जायंट्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार), एविन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, मोहसिन खान, आवेश खान, रवी बिश्नोई

हेही वाचा >> खुशखबर! २०२३च्या आयपीएल पर्वात बंगळुरुचं बळ वाढणार; एबी डिव्हिलियर्स पुन्हा येणार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

विराट कोहली, फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लॉमरोर, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 lsg vs rcb eliminator playing 11 match prediction know who will win prd

Next Story
रविचंद्रन अश्विनवर राग व्यक्त केल्यानं रियान पराग झाला ट्रोल, सूर्यकुमार यादवने केली पाठराखण
फोटो गॅलरी