scorecardresearch

केएल राहुल

कन्ननूर लोकेश राहुल (KL Rahul) हा भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आहे. फलंदाजीसह तो क्षेत्ररक्षण देखील करतो. त्याचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटकमधील बंगळुरु येथे झाला. त्याचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटकचे संचालक होते. त्यानंतर त्यांनी प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली. के.एल.राहुलची आईदेखील प्रोफेसर आहे. त्याला लहानपणापासून क्रिकेटबद्दल आकर्षण होते. हा वारसा त्याला वडिलांकडून मिळाला आहे.


के.एल.राहुलचे शिक्षण मंगळूरु येथे झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. दोन वर्षांनंतर म्हणजे १२ व्या वर्षी त्याला बंगळुरु युनाईटेड क्रिकेट क्लब आणि मंगळुरुच्या क्लबमधून खेळायची संधी मिळाली. पुढे क्रिकेटमध्ये करिअर करायच्या उद्देशाने तो मंगळुरुहून बंगळुरुला राहायला गेला. दरम्यानच्या काळात त्याने जैन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता. के.एल.राहुल कर्नाटक संघाकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. २०१०-११ मध्ये तो पहिल्यांदा स्पर्धांमध्ये खेळला होता. दरम्यान २०१० मध्ये त्याची अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये त्याने १४३ धावा केल्या.


पुढे २०१३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हाच्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने (RCB)राहुलवर सर्वाधिक बोली लावली होती. २०१४ आणि २०१५ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद या संघात होता. पुढे २०१६ मध्ये तो पुन्हा आरसीबीकडून खेळला. २०१८ मध्ये पंजाबने त्याला संघामध्ये घेतले. लगेचच २०१९ मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले. २०१९ ते २०२१ या ३ वर्षांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी राहुलने सांभाळली. २०२२ च्या लिलावामध्ये लखनऊ या नव्या संघाने सर्वाधिक बोली लावत त्याला कर्णधारपद देऊ केले. तेव्हापासून तो लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार आहे. २०१४ मध्ये के.एल.राहुलने भारतीय कसोटी संघामध्ये पदार्पण केले. रोहित शर्माच्या जागी त्याला खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये पदार्पणात त्याला चांगला खेळ करण्यात अपयश मिळाले. पण पुढच्याच सामन्यामध्ये त्याने ११० धावा केल्या. २०१४ पासून त्याने ४७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये २,६४२ धावा केल्या आहेत. २०१६ च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर राहुलची निवड करण्यात आली होती. याच दौऱ्यामध्ये त्याने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,९८६ धावा केल्या आहेत. २०१६ मध्येच राहुलला आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. टी-२० फॉरमॅटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.


के.एल.राहुल त्याच्या एकूण कारकीर्दीमध्ये बऱ्याचवेळा दुखापतग्रस्त झाला आहे. याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाल्याचे पाहायला मिळते. आयपीएल २०२३ मध्ये एका सामन्यादरम्यान त्याला पुन्हा इजा झाली होती. सध्या तो पूर्णपणे फीट झाला आहे अशी माहिती समोर आली आहे. आशिया कप २०२३ साठी त्याचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने तो खेळणार नसल्याचेही म्हटले जात आहे.


Read More
who are the four players who will lift the trophy for Team India
IND vs AUS: मालिका विजयानंतर टीम इंडियाची ट्रॉफी उंचावणारे कोण होते ‘ते’ चौघे? चाहत्यांना पडला प्रश्न

KL Rahul wins the hearts of fans: केएल राहुलने मालिका विजयानंतर चार नवोदीत खेळाडूंना त्यांच्या हातात दिली. ते चारही खेळाडू…

IND vs AUS ODI Series Updates
IND vs AUS ODI Series: रोहित शर्माने मालिका विजयाची ट्रॉफी के एल राहुलकडे देत जिंकली चाहत्यांची मनं, पाहा VIDEO

IND vs AUS 3rd ODI: सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भारतीय…

After the series win against Australia K.L. Rahul's big statement Said Choosing playing XI will be headache for Rohit-Dravid
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयानंतर के.एल. राहुलचे सूचक विधान; म्हणाला, “प्लेईंग-११ निवडणे रोहित-द्रविडसाठी…”

India vs Australia: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात ९९ धावांनी पराभूत करत शानदार विजय संपादन केला. सामन्यानंतर के.एल. राहुलने वरिष्ठ…

IND vs AUS: KL Rahul slams fitness questioners Said wicketkeeping is getting better in last few matches
KL Rahul: फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना राहुलभाईचं सडेतोड उत्तर; म्हणाला, “गेल्या काही सामन्यांत…”

India vs Australia 2nd ODI: के.एल. राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेदरम्यान फिटनेसवर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पहिल्या सामन्यात…

IND vs AUS 2nd ODI Match Updates
VIDEO: के. एल. राहुलने कॅमेरून ग्रीनला दाखवले दिवसा तारे, असा खणखणीत षटकार मारला की चेंडू थेट स्टेडियम बाहेर गेला

KL Rahul’s Sixes Video Viral: केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक सुपर सिक्स मारला. राहुलने ग्रीनने टाकलेल्या चेंडूवर इतका जोरात प्रहार केली…

ICC World Cup 2023: World Cup ticket increased KL Rahul's worries know why he said I will not answer to anyone
World Cup 2023: विश्वचषकाच्या तिकिटांमुळे के.एल. राहुलची चिंता वाढली; म्हणाला, “मी कोणालाच उत्तर देणार नाही…”

ICC World Cup 2023: २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तिकिटांसाठी जो कोणी राहुलला विचारतो त्याला तो प्रतिसाद देत नाही. काय आहे यामागील…

After defeated the Kangaroos in the first ODI KL Rahul Rahul's big statement Said This is not my first time holding the captaincy
KL Rahul: पहिल्या वन डेत कांगारूंना धूळ चारल्यानंतर के.एल. राहुलचे मोठे विधान; म्हणाला, “ही माझी पहिलीच वेळ…”

India vs Australia 1st ODI: पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव केला होता. सामन्यानंतर भारताचा हंगामी कर्णधार के.एल. राहुलने…

IND vs AUS 1st ODI: Team India becomes No.1 in ICC ranking after beat Australia by five wickets Shubman-Rituraj excellent batting
IND vs AUS 1st ODI: टीम इंडिया बनली नंबर १! भारताची ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने मात, शुबमन-ऋतुराज चमकले

India vs Australia 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने…

Bhai nind me khel rahe ho kya Indian fans got angry after seeing KL Rahul's poor wicketkeeping created class through memes
KL Rahul: “भाई नींद में खेलता…”, के.एल. राहुलची खराब विकेटकीपिंग पाहून भारतीय चाहते संतापले; सोशल मीडियावर झाला ट्रोल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार के.एल. राहुलने खराब विकेटकीपिंग केली. त्यानंतर तो सोशल मीडियावर…

Mohammed Shami's five wicket hall the kangaroos collapsed before India's penetrating bowling Australia set a target of 277 runs
IND vs AUS 1st ODI: सिराज नंतर मोहम्मद शमीचा धमाका! कांगारुंविरोधात पंजा उघडला, ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २७६ धावांवर बाद

India vs Australia 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत मोहम्मद शमीने…

IND vs AUS 1st ODI Match Updates
IND vs AUS: के. एल. राहुलने मार्नस लाबुशेनला धावबाद करण्याची संधी गमावल्याने सोशल मीडियावर ट्रोल, पाहा VIDEO

India vs Australia 1st ODI Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील पहिला एकदिवसीय सामना मोहाली येथे खेळला जात आहे. या सामन्यातील…

IND vs AUS 1st ODI: Shreyas Iyer who returned from injury in the first match of the series dropped David Warner's catch
IND vs AUS 1st ODI: श्रेयस अय्यरने सोडलेला झेल टीम इंडियाला पडला महागात, डेव्हिड वॉर्नरचे शानदार अर्धशतक

India vs Australia 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरने…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×