Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Highlights , IPL 2024 Final : आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये कोलकाताने हैदराबादचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवत १० वर्षांनी तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, जो केकेआरच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवत त्यांना अवघ्या ११३ धावांवर गुंडाळले. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाने ११व्या षटकात केवळ दोन गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने अवघ्या २६ चेंडूत ५२ धावांची नाबाद सामना जिंकवून देणारी खेळी खेळली. त्याचबरोबर आंद्रे रसेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad IPL Final Highlights : कोलकाता नाईट राडर्सने आपल्या चौथ्या फायनल सामन्यात तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. याआधी केकेआरने दोनदा (२०१२, २०१४) विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबादचे २०१६ नंतर आयपीएल ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरण्याच स्वप्न हे स्वप्नच राहिले.
कोलकाता संघाची ही चौथी फायनल आहे, तर सनरायझर्सची ही तिसरी फायनल आहे. केकेआरने दोनदा (२०१२, २०१४) विजेतेपद पटकावले आहे. त्याच वेळी, एसआरएचने २०१६ मध्ये आयपीएल चॅम्पियन बनले. मात्र, या दोन्ही संघांमध्ये प्लेऑफ्स किंवा बाद फेरीतील चौथा सामना होणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांचा विजयी विक्रम २-२ असा आहे. या मोसमाच्या क्वालिफायर-१पूर्वी २०१७ च्या एलिमिनेटरमध्ये कोलकाताने सनरायझर्सचा पराभव केला होता. त्याच वेळी, सनरायझर्सने २०१६ एलिमिनेटर तसेच २०१८ क्वालिफायर-२ मध्ये कोलकाताचा पराभव केला होता. यंदाचा क्वालिफायर-१ वगळता उर्वरित तीनही सामने बाद फेरीत झाले आहेत. आता दोन्ही संघ पाचव्यांदा प्लेऑफमध्ये भिडणार आहेत.
???? ??????? ?
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
From one skipper to another ?️
A friendly note ? and an indication of what's coming up later tonight ?#TATAIPL | #KKRvSRH | #Final | #TheFinalcall | @KKRiders | @SunRisers | @ShreyasIyer15 | @patcummins30 pic.twitter.com/E1NmVTdj1d