IPL 2025 Big Blow to RCB: आयपीएल २०२५ सध्या प्लेऑफच्या दृष्टीने रोमांचक वळणावर आहे. गुजरात टायटन्स आणि आरसीबीचे संघ पहिल्या, दुसऱ्या स्थानी असून एक सामना जिंकताच प्लेऑफसाठी पात्र ठरतील. आरसीबीचा संघ यंदाच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी करत खेळत आहे. पण संघाला प्लेऑफच्या जवळ पोहोचताच मोठा धक्का बसला आहे. संघाचा महत्त्वाचा खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
आरसीबीच्या संघाची चांगली घडी बसली आहे आणि संघातील सर्व खेळाडू चांगलेच फॉर्मात आहेत. पण आता आरसीबीच्या संघाची संपूर्ण घडी विस्कटणार आहे. आधीच संघातील तीन खेळाडू दुखापतीमुळे बाहेर बसले आहेत. ज्यामध्ये रजत पाटीदार, फिल सॉल्ट आणि जोश हेझलवुडच्या नावाचा समावेश आहे. पण आता एक खेळाडू तर स्पर्धेबाहेर झाला आहे.
बंगळुरूने एका महत्त्वाच्या खेळाडूला गमावले आहे. हा खेळाडू म्हणजे देवदत्त पडिक्कल आहे, ज्याने या हंगामात आरसीबीसाठी काही उत्कृष्ट खेळी केल्या. पडिक्कलला एका सामन्यादरम्यान दुखापत झाली होता. त्याच्या उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगवर ताण आला होता ज्यामुळे त्याला आता स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. तर आरसीबीने त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात सामील केलं आहे.
पडिक्कलची जागा आरसीबी ताफ्यात मयंक अग्रवालने घेतली आहे, आरसीबीने त्याला १ कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे. मयंकची बेस प्राईस १ कोटी रुपये होती आणि आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नव्हते. आता पडिक्कलच्या दुखापतीमुळे त्याला आरसीबी संघात सामील होण्याची संधी मिळाली आहे.
मयंक अग्रवाल एक अनुभवी आणि चांगला खेळाडू आहे पण पडिक्कलच्या जाण्याने आरसीबीला नक्कीच धक्का बसला आहे. कारण पडिक्कल या हंगामात तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता. या खेळाडूने १० सामन्यात २४७ धावा केल्या होत्या, दोन अर्धशतकं त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. मोठी गोष्ट म्हणजे त्याचा स्ट्राईक रेटही १५० पेक्षा जास्त होता.