इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) १५ व्या सीझनमध्ये यंदा १० संघ मैदानात उतरले आहेत. प्रत्येक संघ सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आयपीएलच्या चषकाजवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान अनेक विक्रमही होतात. अशाच प्रकारचा सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा भारतीय खेळाडूचा विक्रम आजही कायम आहे. इतर कोणत्याही खेळाडूला अद्याप हा विक्रम मोडता आलेला नाही. याच खेळाडूने क्रिकेटबाबत सोशल मीडियावर पोस्ट केलीय. ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. हा भारतीय गोलंदाज कुणी दुसरा नाही, तर प्रवीण कुमार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आईपीएलमध्ये एकूण ५ संघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोलंदाज प्रवीण कुमारने आपला शेवटचा आईपीएल सामना गुजरात लॉयन्सच्या संघाकडून खेळला होता. त्याच्या गोलंदाजीची जादू काही अशी आहे, की आयपीएलच्या इतिहासात त्याने सर्वाधिक मेडन ओव्हर टाकलेत. खास गोष्ट ही, की प्रवीण कुमारच्या या रेकॉर्डला आजवर कुठलाच गोलंदाज तोडू शकलेला नाही. प्रवीण कुमार गेली ५ वर्ष आयपीएलपासून दूर आहे.

प्रवीण कुमारने क्रिकेट खेळाबाबत कू वर पोस्ट करून म्हटलं, “क्रिकेट पूर्णत: अनिश्चिततांचा खेळ आहे. यात चित्र बदलण्याची शक्यता हरेक क्षणी असते.”

Koo App
क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। IPL में अब भी पासा पलटने की पूरी गुंजाइश है। #IPL2022 ?
– Praveen kumar (@praveenkumarofficial) 20 Apr 2022

या खेळाबाबत असे म्हटले जाते, की हा फलंदाजांसाठी तुलनेने सोपा आणि फायद्याचा आहे, पण गोलंदाजांसाठी खूप अवघड आहे. पणप्रवीण कुमार हा असा खेळाडू आहे, ज्याने फलंदाजांना धावा काढण्यासाठी अक्षरश: तरसवलं.

प्रवीण कुमार आयपीएलमध्ये पाच संघांकडून खेळला आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन सीझन्समध्ये प्रवीण कुमार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाचा भाग होता. यादरम्यान वर्ष २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांनी हॅट्रिकही केली होती. असे करणारा तो आयपीएलचा सातवा गोलंदाज ठरला. वर्ष २०११ ते २०१३3 च्या दरम्यान प्रवीण किंग्स इलेवन पंजाबसाठी खेळला.

हेही वाचा : अभिमानास्पद, ‘क्रिकेटर्स ऑफ द ईअर २०२२’चे पाच पैकी दोन पुरस्कार ‘या’ भारतीय खेळाडूंना

अशा प्रकारे प्रवीण कुमारने २००८ ते २०१७ दरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाब, सनराइझर्स हैदराबाद, गुजरात लॉयन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू अशा चार संघांकडून खेळत आईपीएलमध्ये १४ ओव्हर मेडन फेकल्यात. प्रवीण कुमारच्या या ओव्हर्समध्ये आजवर कुठलाच फलंदाज त्याच्या चेंडूवर धावा काढू शकलेला नाही. प्रवीण कुमारच्या आयपीएल करियरबद्दल बोलायचे तर आयपीएलच्या ११९ मॅचेसमध्ये प्रवीण कुमारने ९० विकेट आपल्या नावावर केल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl record of maiden over till on this indian cricketer after 5 years pbs
First published on: 22-04-2022 at 16:21 IST