KKR sign Jason Roy to IPL 2023: आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला शाकीब अल हसनच्या रूपाने मोठा धक्का बसला. शाकीब आंतरराष्ट्रीय कर्तव्य आणि वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलच्या १६व्या हंगामात केकेआरचा भाग होऊ शकला नाही. त्याचबरोबर कोलकाता संघाचां कर्णधार श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्यामुळे केकेआरने इंग्लंडचा वेगवान फलंदाज जेसन रॉयला आयपीएल २०२३ साठी संघाचा भाग बनवले आहे. रॉय हा त्याच्या आक्रमक फलंदाजासाठी ओळखला जातो. त्याने टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ६ शतके झळकावली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाकीब अल हसनला डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या मिनी लिलावात केकेआरने १.५ कोटी रुपये देऊन संघाचा भाग बनवले होते, परंतु काही कारणांमुळे तो यावर्षी स्पर्धेचा भाग होऊ शकला नाही. त्याचबरोबर श्रेयस अय्यरही स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आता त्याच्या जागी जेसन रॉय केकेआर संघाचा भाग बनला आहे.


केकेआरने जेसन रॉयला संघाचा भाग बनवले.

आयपीएल २०२३ साठी, केकेआरने २.८ कोटी रुपये मोजून जेसन रॉयचा संघात समावेश केला आहे. रॉयची मूळ किंमत १.५ कोटी रुपये होती. कोलकाताने त्याला जवळपास दुप्पट आधारभूत किंमत देऊन संघाचा भाग बनवले आहे. रॉय इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅट खेळतो. त्याचबरोबर मर्यादित चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याची पकड चांगलीच आहे.

टी-२० कारकिर्दीत ६ शतके झळकावली आहेत –

जेसन रॉयने आतापर्यंत त्याच्या टी-२० कारकिर्दीत एकूण ३१३ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ३०७ डावांमध्ये फलंदाजी करताना रॉयने २७.७७ च्या सरासरीने आणि १४१.९० च्या स्ट्राइक रेटने एकूण ८११० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण ६ शतके आणि ५३ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १४५ आहे.

हेही वाचा – IPL 2023: खराब फॉर्मवरुन वीरेंद्र सेहवागने पृथ्वी शॉचे टोचले कान, शुबमनचं उदाहरण देत म्हणाला…

जेसन रॉयची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

इंग्लंडकडून खेळणाऱ्या जेसन रॉयने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ५ कसोटी, ११६ एकदिवसीय आणि ६४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १८.७० च्या सरासरीने १८७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यात ३९.९१ च्या सरासरीने ४२७१ धावा केल्या आहेत. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २४.१५च्या सरासरीने आणि १३७.६१च्या स्ट्राईक रेटने १५२२ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kkr sign jason roy to replace shreyas iyer for ipl 2023 vbm