KKR team having fun in swimming pool video: सध्या भारतात एकीकडे आयपीएल सुरू आहे, तर दुसरीकडे उष्णतेनेही कहर केला आहे. वाढत्या उष्णतेमुले सर्वसामान्यांसोबतच क्रिकेटपटूही हैराण झाले आहेत. दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंनी कडक उन्हापासून वाचण्यासाठी पूलचा सहारा घेताना दिसले आहेत. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत केकेआरचे खेळाडू व्हॉलीबॉल खेळतानाही दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीश राणाच्‍या नेतृत्‍वाखालील केकेआर आपला शेवटचा साखळी एलएसजीविरुद्ध खेळला आहे. ईडन गार्डन्स मैदानावर चालू मोसमातील ६८व्या सामन्यात आज दोन्ही संघ आमनेसामने येतील. केकेआरचा संघ या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान केकेआर फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केली आहे. ज्यामध्ये नितीश राणा, रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर यांच्यासह संघातील अनेक खेळाडू दुपारच्या उन्हापासून आराम मिळवण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये उतरल्याचे दिसत आहेत. स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारण्यासोबतच सर्व खेळाडूंनी खूप मजा केली. केकेआरने या व्हिडीओला कॅप्शन देताना लिहले, ‘मौज-मस्तीसह गर्मीवर मात करत आहेत.’

या दरम्यान त्यांनी व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेतला. तर दुसरीकडे काही खेळाडू आणि स्टाफ स्विमिंग पूलच्या काठावर बसून नुसते बघून मजा घेताना दिसले. केकेआरच्या या पोस्टला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. तसेच व्हिडीओला खूप लोकांना आवडत आहेत. त्याचबोरबर काहींनी कमेंट्सद्वारे त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या ​​आहेत. एका चाहत्याने कमेंट करून लिहिले की, उद्याच्या सामन्यात तुम्ही सर्वांनी आपले सर्वोत्तम द्या.

हेही वाचा – IPL 2023: कर्णधार हार्दिक पांड्याची विमानात स्वॅगवाली एन्ट्री, गुजरात टायटन्सने शेअर केला मजेदार VIDEO

केकेआर विरुद्ध एलएसजी हेड टू हेड आकडेवारी –

विशेष म्हणजे आयपीएलच्या १६व्या हंगामात केकेआर आणि एलएसजीचे संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. याआधी मेगा लीगमध्ये दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यात लखनऊने कोलकात्यावर विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत केकेआरवर क्रृणाल पंड्या अँड कंपनीचे पारडे जड आहे. आता कोलकाता त्यांच्या आगामी सामन्यात लखनऊला हरवून त्यांच्याविरुद्ध विजयाचे खाते उघडणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata knight riders franchise shared a video of their players playing volleyball in a swimming pool vbm