Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Highlights: केएल राहुलच्या लखनऊने चेपॉकचा अभेद्य किल्ला भेदत चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. चेन्नईने दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत स्टॉइनसच्या शतकी खेळीच्या जोरावर विक्रमी विजयाची नोंद केली. एलएसजीने चेन्नईमध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत विजय मिळवला आहे. चेन्नईविरुद्ध चेपूकमध्ये २११ धावांचे लक्ष्य पार करत लखनौ संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लखनौ संघऊने ३ चेंडू शिल्लक असताना ही धावसंख्या गाठली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्कस स्टॉइनसने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी केली आहे. त्याने एकट्याने लखनौ संघाला सामना जिंकून दिला. या विजयासह लखनौचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. लखनौने चेन्नई संघाचा या हंगामात सलग दुसऱ्यांदा पराभव केला आहे. यापूर्वी लखनौमध्येच चेन्नई संघाचा एलएसजीकडून पराभव झाला होता. तर आता चेपाऊक वरही लखनऊने बाजी मारली आहे.

मार्कसने या सामन्यात ६३ चेंडूत १२४ धावांची नाबाद खेळी केली. ज्यामध्ये त्याने १३ चौकार आणि ६ षटकार मारले. आयपीएलच्या इतिहासातील मार्कसची ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यासोबतच त्याने आयपीएलचा १३ वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. आयपीएलमधील दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता मार्कस स्टॉइनसच्या नावावर नोंदवला गेला आहे.

यापूर्वी पॉल वल्थाटीने २०११ मध्ये चेन्नईविरुद्ध १२० धावांची नाबाद इनिंग खेळली होती. तर वीरेंद्र सेहवागने २०११ मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध ११९ धावांची इनिंग खेळली होती. या यादीत संजू सॅमसनचाही समावेश आहे. त्याने २०२१ मध्ये पंजाबविरुद्ध ११९धावांची इनिंग खेळली होती. तर शेन वॉटसनने २०१८ मध्ये हैदराबादविरुद्ध ११७ धावांची नाबाद खेळी खेळली होती.

लक्ष्याचा पाठलाग करताना नोंदवलेली सर्वात मोठी धावसंख्या
मार्कस स्टॉयनिस – १२४ धावा (लखनऊ वि चेन्नई) २०२४
पॉल वल्थाटी – १२० (पंजाब वि चेन्नई) २०११
वीरेंद्र सेहवाग – ११९ (डेक्कन चार्जर्स वि दिल्ली)२०११
संजू सॅमसन – ११९ (राजस्थान वि पंजाब) २०२१
शेन वॉटसन – ११७ (चेन्नई वि हैदराबाद) २०१८ अंतिम सामना

८ वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मार्कस स्टॉइनिसने यांच्या हंगामात पहिल्यांदाच शतक झळकावले आहे. पहिले शतक झळकावण्यासाठी त्याला आठ वर्षे लागली. मार्कसच्या खेळीमुळे लखनौचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marcus stoinis highest individual scores in ipl run chases with 124 runs broke 13 years record in csk vs lsg ipl 2024 bdg