आयपीएलचा पंधरावा हंगाम अनेक अर्थांनी वेगळा ठरला आहे. या हंगामात दिग्गज संघांना धक्का बसला असून ते सध्या गुणतालिकेत शेवटी आहेत. तर दुसरीकडे गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्ससारखे संघ गुणतालिकेत टॉप चारमध्ये असून त्यांनी धडाकेबाज कामगिरी करुन दाखवली आहे. लखनऊ, गुजरात या संघांसोबतच राजस्थान आणि बंगळुरु या दोन संघांनी गोलंदाजी विभागात चांगली कामगिरी केली आहे. अन्य संघांच्या तुलनेत जास्त विकेट्स घेतल्यामुळेच या संघांना गुणतालिकेत वरचे स्थान गाठण्यात यश मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> IPL 2022 GT vs MI : आज गुजरात-मुंबई आमनेसामने, कोण ठरणार सरस? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स हा संघ सर्वात जास्त म्हणजेच 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकलेला संघ आहे. आयपीएलचे 50 झालेले असूनही या संघाला सूर गवसलेला नाही. हा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर फेकला जाणारा पहिला संघ ठरला आहे. या संघाने गोलंदाजी विभागात खराब कामगिरी केली. मुंबईचे गोलंदाज विकेट्स घेण्यात अपयशी ठरल्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. तर दुसरीकडे 4 वेळा विजेता झालेला चेन्नई सुपरकिंग्स हा संघदेखील जवळपास बाहेर पडला आहे. तसेच दोनदा आयपीएलचा खिताब जिंकलेल्या केकेआर संघाचीही हीच स्थिती आहे.

हेही वाचा >> Asian Games Postponed: चीनमध्ये करोनाचा कहर, आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलली

तर दुसरीकडे बाकी सर्व संघांना मागे टाकत गुजरात, लखनऊ, राजस्थान आणि बंगुळुरु हे चार संघ गुणतालित सर्वात समोर आहेत. या संघानी गोलंदाजी विभागात आतापर्यंत चांगली कामगिरी करुन दाखवलेली आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 69, लखनऊ सुपर जायंट्सने 61 आणि गुजरात टायटन्सने 60 विकेट्स घेतेलेल्या आहेत. भारतीय क्रिकेटर्स आणि चाहते या चारही संघांचं भरभरून कौतुक करताना दिसतायत. गोलंदाजी विभागात चांगली कमगिरी केल्यामुळेच हे संघ प्रतिस्पर्धी संघांवर मात करु शकलेले नाही. त्याचा परिणाम म्हणून हे चार संघ सध्या गुणतालिकेत टॉप चारमध्ये असून ट्रॉफी जिंगण्यासाठी महत्त्वाचे दावेदार मानले जात आहेत.

मात्र क्रिकेट या खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्लेऑफपर्यंत कोण मजल मारणार हे येणारा काळच ठरवेल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most wicket taker team is on top of point table in ipl 2022 prd