Naveen Ul Haq And Virat Kohli Controversy: अलीकडेच एलएसजी आणि आरसीबी संघात झालेल्या सामन्यात नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यात वादावादी झाली होती. या दोन्ही खेळाडूंमधील भांडणामुळे बरीच चर्चा झाली होता. त्याचवेळी यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली आमनेसामने आले होते. त्यानंततर मॅच रेफरीने विराट कोहली आणि गौतम गंभीरवर कठोर भूमिका घेतली. यानंतर दोन्ही खेळाडूंना १०० टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला. आता लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू नवीन-उल-हकने पुन्हा एकदा विराट कोहलीचे नाव न घेता निशाणा साधला आहे.
‘जसा आहेस तसाच राहा… बदलू नको’ –
नवीन-उल-हकने पुन्हा विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. अफगाणिस्तानच्या या खेळाडूने गौतम गंभीरसोबतचा फोटो इन्स्टाग्राम पोस्ट केला आहे. तसेच, त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “लोकांशी तसेच वागा, जशी त्यांची योग्यता आहे. आणि लोकांशी ते जसे पात्र आहेत तसे बोला.” याशिवाय नवीन उल हकने गौतम गंभीरला GOAT म्हटले. त्याचवेळी गौतम गंभीरनेही या पोस्टवर कमेंट केली आहे. गौतम गंभीरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘जसा आहेस तसाच रहा… बदलू नको.’
नवीन उल हकची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल –
नवीन उल हकने विराट कोहलीचे नाव घेतले नसले तरी अफगाणिस्तानच्या खेळाडूने भारताच्या माजी कर्णधारावर निशाणा साधल्याचे सोशल मीडियावरील चाहत्यांचे मत आहे. मात्र, नवीन-उल-हकच्या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करत आहेत. विशेष म्हणजे, लखनौ सुपर जायंट्सने नवीन-उल-हकला ५० लाख रुपयांमध्ये आपल्या संघाचा भाग बनवले. त्याचबरोबर या खेळाडूने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे.
हेही वाचा – Virat Kohli: ७००० धावा पूर्ण केल्यानंतर विराटने दिली महत्वाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला सतत…’
याआधी, लखनऊविरुद्धच्या सामन्याच्या एका दिवसानंतर कोहलीने एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये लिहिले होते, ‘जे काही आपण ऐकतो ते तथ्य नसून मत आहे. आपण जे काही पाहतो ते सत्य नसून वृत्ती असते.’ यानंतर नवीननेही इन्स्टाग्राम स्टोरी अपडेट करताना लिहिले होते, ‘तुम्ही ज्यासाठी पात्र आहात ते तुम्हाला मिळते, हे असेच असले पाहिजे आणि असेच घडते.’