ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२४च्या साखळी टप्प्यातील सर्व १४ सामने खेळले आहेत. साखळी टप्प्यातील अखेरच्या सामन्यात दिल्लीने अष्टपैलू खेळी करत लखनऊचा १९ धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्ली १४ गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे, पण प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. दिल्लीने आऱसीबीविरूद्धचा सामना जिंकला असता तर ते प्लेऑफच्या शर्यतीत नक्कीच एक पाऊल पुढे असते, यावर ऋषभ पंतने साम्यानंतर वक्तव्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत असे मानतो की कदाचित त्याच्या एका सामन्याच्या बंदीमुळे दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळाले नाही, कारण तो मैदानात असता तर त्यांना रॉयलविरुद्धचा सामना जिंकण्याची मोठी संधी मिळाली असती. या आयपीएल हंगामात तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दिल्लीचा संघ दोषी आढळल्याने पंतला १२ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धचा सामना खेळण्यावर बंदी घातली होती.

दिल्ली कॅपिटल्सने केवळ आरसीबीविरुद्धचा सामना गमावला नाही, तर ४७ धावांच्या पराभवामुळे त्यांच्या नेट रन रेटवरही परिणाम झाला. आता प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी दिल्लीला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. दिल्ली संघ आता १४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांना सनरायझर्स हैदराबाद (SRH), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनऊ संघाच्या पराभवासाठी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यातील पराभवाची प्रार्थना करावी लागेल. दिल्लीच्या विजयासह राजस्थान रॉयल्स प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला.

हेही वाचा – IPL 2024: दिल्लीचा विजय CSK आणि SRH च्या पथ्यावर, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी करावी लागणार एकच गोष्ट

सध्या दिल्ली कॅपिटल्सने १९ धावांनी विजय मिळविल्यानंतर पंत म्हणाला, “मी असे म्हणणार नाही की जर मी खेळलो असतो, तर आम्ही नक्कीच सामना जिंकला असता, पण जर मला गेल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली असती तर संघाला प्लेऑफसाठी पात्र होण्याची अधिक चांगली संधी होती.”

पंत म्हणाला, “आम्ही मोसमाची सुरुवात खूप आशेने केली, पण आम्हाला दुखापती आणि अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला, पण फ्रँचायझी म्हणून तुम्ही नेहमीच तक्रार करू शकत नाही, तुमच्याकडे जे आहे त्यासह तुम्हाला कामगिरी करत राहावी लागेल. काही गोष्टी अशा आहेत ज्यावर तुमचे नियंत्रण असते, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही नियंत्रित करू शकत नाही.”

हेही वाचा- IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?

दिल्लीसाठी आयपीएलच्या या मोसमाची सुरुवात चांगली झाली नाही, आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाला अखेरच्या टप्प्यातील सामन्यांमध्ये लय मिळाली. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांच्या दुखापतींचाही दिल्लीला फटका बसला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant statement after dc win said if i play against rcb we would have better chance to qualify ipl 2024 bdg