क्रिकेटप्रेमींच्या आकर्षणाचा विषय असलेली आय़पीएल स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळण्यासाठी रोहित शर्मा सज्ज झाला आहे. आय़पीएलपूर्वी तो आपल्या लेकीसोबत मस्ती करताना दिसत आहे.


सामन्यांपूर्वी रिलॅक्स करण्याकरता रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्ससोबतच्या शूटिंगदरम्यान मजा-मस्ती करत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये तो मुलगी समायरासोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना रोहितने लिहिलं आहे की, ‘कॅम्पेनचा तो भाग जो तुम्ही पाहू शकत नाही.’ अनेकदा शांत स्वभावात दिसणारा रोहित या शूटदरम्यान अगदी मस्त मूडमध्ये धमाल करत आहे.


दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईचा पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेच्या लीग सामन्यात प्रत्येक संघ १४ सामने खेळणार असून मुंबईचे प्रत्येकी दोन सामने कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ आणि चेन्नई या संघाविरोधात होणार आहेत. तर हैदराबाद, आरसीबी, पंजाब आणि गुजरात यांच्याविरोधात एक एक सामना होणार आहे.