Travis Head Breaks Adam Gilchrist’s Record : आयपीएलच्या १७ व्या हंगाातील दुसरा क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉल्सवर ३६ धावांनी मात ६ वर्षांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्यात हैदराबाद संघातील ट्रॅव्हिस हेडने २४ धावांची खेळी करत आयपीएलच्या इतिहासातील १५ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. या सीझनमध्ये हेडची बॅट चांगलीच बोलतांना दिसली आहे, ज्यामध्ये त्याने १४ डावांमध्ये ४३.६२ च्या सरासरीने एकूण ५६७ धावा केल्या आहेत. आता हेड आयपीएलच्या एकाच मोसमात पॉवरप्ले दरम्यान सर्वाधिक बाउंड्री (चौकार-षटकार) मारणारा खेळाडू बनला आहे. ट्रॅव्हिस हेडने ॲडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडला.

ॲडम गिलख्रिस्टचा मोडला १५ वर्ष जुना विक्रम –

ट्रॅव्हिस हेडने आयपीएलच्या १७ व्या हंगामात बॅटने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ज्यामध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाला पॉवरप्लेमध्ये अशी सुरुवात दिली ज्यामध्ये संपूर्ण सामन्यात संघाचे वर्चस्व होते. या हंगामाक हेडच्या बॅटमधून एकूण ९६ बाउंड्री दिसल्या आहेत, त्यापैकी पॉवरप्ले दरम्यान त्याने ७४ बाउंड्रीज मारल्या आहेत. यासह हेड आता आयपीएल इतिहासातील पॉवरप्ले दरम्यान एका मोसमात सर्वाधिक चौकार मारणारा खेळाडू बनला आहे. या प्रकरणात, हेडने ॲडम गिलख्रिस्टचा १५ वर्ष जुना विक्रम मोडला आहे, ज्याने २००९ च्या आयपीएल हंगामात पॉवरप्लेमध्ये एकूण ७२ बाउंड्री लगावल्या होत्या.

आयपीएलच्या एका मोसमात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक बाउंड्री मारणारे खेळाडू :

ट्रॅव्हिस हेड – ७४ बाउंड्री (२०२४)
ॲडम गिलख्रिस्ट – ७२ बाउंड्री (२००९)
डेव्हिड वॉर्नर – ७२ बाउंड्री (२०१६)
यशस्वी जैस्वाल – ७० बाउंड्री (वर्ष २०२३)

हेही वाचा – SRH vs RR : ट्रेंटने हैदराबादच्या फलंदाजीचे नट-‘बोल्ट’ ढिल्ले करत रचला विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा गोलंदाज

नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पहिल्या षटकात अभिषेक शर्माने नक्कीच आक्रमक फलंदाजी केली, पण एक चौकार आणि एक षटकार मारल्यानंतर ट्रेंट बोल्टचा बळी ठरला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुल त्रिपाठीने येताच चेंडू सीमारेषेकडे पाठवण्यास सुरुवात केली. त्रिपाठी खूपच चांगला दिसत होता आणि त्याने १५ चेंडूंच्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार मारले होते, परंतु पाचव्या षटकात ट्रेंट बोल्टने त्याला बाद केले.

त्याच षटकात एडन मार्करमही केवळ एक धाव घेत पॅव्हेलियनमध्ये परतला. चांगली सुरुवात असूनही, सनरायझर्स हैदराबादने पॉवरप्ले षटकांत ६८ धावांत ३ गडी गमावले. येथून धावगती अतिशय संथ झाली आणि दबावाखाली नितीश रेड्डी आणि अब्दुल समद बाद झाले. दरम्यान, हेन्रिक क्लासेनने १८ व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु तो वादळी पद्धतीने डाव संपवण्यापूर्वीच संदीप शर्माने त्याला बोल्ड केले. शाहबाज अहमदने १८ चेंडूत १८ धावा केल्या. सतत पडणाऱ्या विकेट्समुळे सनरायझर्स हैदराबादला निर्धारित २० षटकांत केवळ १७५ धावाच करता आल्या. मात्र प्रत्युत्तरात राजस्थान संघाला ७ बाद १३९ धावाच करता आल्या.

हेही वाचा – ‘जर मी त्याच्या जागी असते तर हार मानली असती’, पत्नी दीपिकाची कार्तिकबद्दल प्रतिक्रिया, विराट काय म्हणाला?

सनरायझर्स हैदराबादकडून फिरकी गोलंदाजांची धुलाई –

या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फिरकी गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. एकीकडे रविचंद्रन अश्विनने अवघ्या ४ षटकांत ४३ धावा दिल्या. हा स्पेल त्याच्यासाठी वाईटही होता. कारण तो एकही विकेट घेऊ शकला नाही. दुसरीकडे युजवेंद्र चहललाही एकही विकेट घेता आली नाही. त्याने चार षटकांत ३४ धावा दिल्या. दोन्ही फिरकीपटूंनी मिळून हैदराबादविरुद्ध ८ षटकात ७७ धावा दिल्या. दुसरीकडे, वेगवान गोलंदाजांनी १२ षटकात एकूण ९७ धावा दिल्या वेगवान गोलंदाजांनी डावात सर्व ८ विकेट्स घेतल्या.