आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोरच्या अडचणी काहीकेल्या कमी होत नाहीयेत. शुक्रवारी संघातील एक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोनाची लागण झाली. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व संघाचा दुबईतला क्वारंटाइन कालावधी वाढवण्यात आला आहे. यानंतर लगेचच संघाचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातून माघार घेतली आहे. सुरेश रैनानने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ही माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैय्यक्तीक कारणांमुळे सुरेश रैनाने यंदाच्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला असून आम्ही सुरेश रैना आणि त्याच्या परिवारासोबत आहोत अशी माहिती काशी विश्वनाथन यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी चेन्नईत सुरेश रैना ट्रेनिंग कँपमध्ये सहभागी झाला होता. १५ ऑगस्ट रोजी धोनीसोबत रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे सुरेश रैनाच्या जागी चेन्नईचा संघ कोणत्या खेळाडूला संधी देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य पाहा – CSK चा स्वदेशीचा नारा, युएईत ताज हॉटेलमध्ये थांबणार संघ…

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh raina returned to india for personal reason will not be available for ipl 2020 psd