आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्यात मुंबईवर मात करुन चेन्नईने विजयी सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्स संघासमोर किंग्ज इलेव्हन पंजाबचं आव्हान असणार आहे. दिल्लीच्या संघात यंदा Player Transfer Window मार्फत अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन आश्विन हे दोन खेळाडू आले आहेत. आश्विनला दिल्लीकडून खेळत असताना मंकडींग करण्याची परवानगी देणार नाही असा पवित्रा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग यांनी घेतला होता. यानंतर आश्विन आणि पाँटींग यांच्यात चर्चा झाली. परंतू यानंतरही रिकी पाँटींग यांचा मंकडींगला विरोध कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Amstrad Insidesport Face 2 Face या कार्यक्रमात बोलत असताना रिकी पाँटींगने मंकडींग संदर्भात आपलं मत सांगितलं. दिल्ली अंतिम सामन्यात पोहचल्यास आश्विनला मंकडींगची परवानगी देशील का असा प्रश्न रिकी पाँटींगला विचारण्यात आला. “आश्विन किंवा दिल्लीच्या कोणत्याही गोलंदाजाने मंकडींग करु नये असं माझं मत आहे. दिल्ली अंतिम सामन्यात पोहचली तर आश्विनला अखेरचं षटक टाकायला मिळणार नाही. पण अगदीच अशी परिस्थिती आली तर त्याने मंकडींग करु नये असं माझं मत आहे. कदाचीत मंकडींग करुन तुम्ही स्पर्धा जिंकू शकाल…पण यानंतर तुमच्या मनात पोकळ भावना तयार होते.”

दरम्यान पंजाबविरुद्ध पहिल्या सामन्याआधीच दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. संघाचा महत्वाचा गोलंदाज इशांत शर्मा सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो सलामीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. असं झाल्यास दिल्ली इशांतच्या जागेवर कोणाला संधी देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will be a hollow feeling to win an ipl final with a mankad says ricky ponting psd