सध्या सर्व खेळाडू हे आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करत आहेत. १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या सामन्याने आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. RCB चा संघ ही या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. RCB चा संघ म्हटला की डोळ्यासमोर युजवेंद्र चहल हे नाव यायलाच हवं. नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असणारा चहल मैदानावर आपल्या फिरकी गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणतो. तेरावा हंगाम सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना चहलने आता एक अजब हट्ट केला आहे.
चहलने RCB संघाचे Director of Cricket Operations माईक हेसन यांच्याकडे आपल्याला फलंदाजीसाठी सलामीला पाठवण्याची मागणी केली. हेसन यांनी नाही म्हणतात चहलने काय केलं तुम्हीच पाहा…चहलने एक गमतीशीर कॅप्शन देत हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
RCB च्या संघाची आयपीएलच्या इतिहासातली कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. आतापर्यंत RCB चा संघ एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवू शकलेला नाही. गेल्या काही हंगामात RCB चा संघ गुणतालिकेत तळाशी राहिलेला आहे. त्यामुळे यंदा RCB चा संघ कशी कामगिरी करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.